Crowd of devotees during the visit of Mana Dada and Baba Ganapati to Harihar in Jalka Bazar area of ​​Nandurbar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : जिल्ह्यातील 200 गणेश मंडळांकडून शांततेत विसर्जन! हरिहर भेट ठरले खास आकर्षण; कडक पोलिस बंदोबस्तात निघाल्या मिरवणुका

Latest Ganeshotsav 2024 News : विसर्जनाचा दीड ते पाच, सात, नऊ व शेवटचा टप्पा अनंत चतुर्दशीला झाला. प्रशासनाकडील नोंदीनुसार एक हजार मंडळांनी गणेश स्थापना केली होती.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : गणेशोत्सवातील शेवटच्या टप्प्यातील गणेश विसर्जनात मंगळवारी (ता. १८) दोनशे मंडळांनी अत्यंत भक्तिभावाने ढोल-ताशांच्या गजरात रात्रभर थिरकत गणरायाला निरोप दिला. तसेच पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रणही दिले. दरम्यान, जिल्ह्यात अत्यंत शांततेत व कडक पोलिस बंदोबस्तात निर्विघ्न गणरायाचे विसर्जन झाले. (visarjan in peace from 200 Ganesha Mandals in nandurbar)

दादा गणपती मिरवणुकीत नृत्य करताना माजी खासदार डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित.

विसर्जनाचा दीड ते पाच, सात, नऊ व शेवटचा टप्पा अनंत चतुर्दशीला झाला. प्रशासनाकडील नोंदीनुसार एक हजार मंडळांनी गणेश स्थापना केली होती. तर खासगी बाप्पा घराघरांत विराजमान झाले होते. टप्प्याटप्प्याने मंडळांनी गणरायाची मनोभावी सेवा करत उत्साहाने विसर्जन केले. सर्वच टप्प्यात अत्यंत शांतता व नियमांचे काटेकोर पालन झाले.

मंगळवारी (ता. १७) शेवटच्या टप्च्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. सकाळपासूनच मंडळांनी मिरवणुका काढून ढोल-ताशांच्या निनादात गणरायाला निरोप दिला. सायंकाळपासून मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. काही मंडळांनी रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत मूर्तींचे विसर्जन केले. मिरवणुका ठरलेल्या वेळेनुसार लांबल्या. मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत मिरवणुका निविर्घ्न पार पडल्या.

येथील १३८ वर्षाची पंरपरा असलेले दादा व बाबा गणपतीची हरिहर भेट ही येथील गणेशोत्वातील खास आकर्षण आहे. या वर्षी बाराला होणारी ही भेट रात्री दीडलाझाली. त्यानंतर सर्व गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका एका रांगेत पुढे निघाल्या. या वेळी हजारोच्या संख्येने उपस्थित भाविकांनी एकच जल्लोष केला. या दोन्ही मानाच्या गणपतींचे पहाटे विसर्जन झाले. (latest marathi news)

राम-रहीम समितीतर्फे सत्कार

शांततेत मिरवणुका काढणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा येथील राम-रहिम समितीतर्फे सत्कार करण्यात येतो. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, गजेंद्र शिंपी, कैलास पाटील, कुणाल वसावे आदींनी गणपती मंदिर परिसरात मंडळाचा कार्यकर्त्यांचा सत्कार केला. दरम्यान, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसह गणपती मंदिर परिसरात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

नेत्यांनी धरला ठेका

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा निनादाने तरुणाईच नव्हे, तर वृद्धांच्याही अंगात तरुणाई संचारली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकही गणरायाला नाचून आनंद व्यक्त करीत निरोप देत होते. दरम्यान, मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांनीही ढोल-ताशांच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT