Zilla Parishad Marathi school under repair. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar ZP School : जिल्हा परिषद शाळा स्वागतासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा

डॉ. जसपाल वळवी ः सकाळ वृत्तसेवा

Nandurbar ZP School : राज्यभरातील शाळांची शनिवारी (ता. १५) घंटा वाजणार असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शनिवारपासून शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ सुरू होत असून, तालुक्यातील ३२१ जिल्हा परिषद शाळांनी विद्यार्थी स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ( Zilla Parishad School ready for begun )

यात सकाळी प्रभातफेरी काढून, पहिल्याच दिवशी पुस्तकवाटप करून पुष्पगुच्छ तसेच मिष्टान्न व गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवडे यांनी सांगितले. शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती, दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागतही होणार असल्याचेही या वेळी गटशिक्षणाधिकारी नरवडे यांनी म्हटले. अक्कलकुवा तालुक्याला यंदा एक लाख २० हजार ६४९ पुस्तके प्राप्त झाली असून, तालुक्यातील सर्व शाळांवर पुस्तके पोचत करण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतच्या ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकवाटप करण्यात येणार आहे, तसेच यंदा तालुक्यातील १७ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ११ जूनला करण्यात आली आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यात मराठी माध्यमातील एकूण ६४ व ऊर्दू माध्यमाचे १० प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (latest marathi news)

या वेळी गटशिक्षणाधिकारी नरवडे यांनी सांगितले, की तालुक्यातील ज्याची शाळांची देखभाल-दुरुस्ती बाकी होती त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतस्तरावर आदेश दिले असून, पेसांतर्गत शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यानुसार तालुक्यातील अनेक शाळांची दुरुस्ती केली आहे. एकंदरीत यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अक्कलकुवा तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.

''अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले असून, स्वागतोत्सव साजरा करण्यासाठी प्रभातफेरी काढून, पुस्तके व गोड खाऊवाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आदेश दिले आहे. शंभर टक्के उपस्थितीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.''-प्रशांत नरवडे, गटशिक्षणाधिकारी, अक्कलकुवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT