c. Pu. Classrooms being decorated in Patil Secondary School. In Shivdarshan Vidyalaya, preparations are underway to give books to the students on the very first day. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar ZP School : कुठे आनंददायी शाळा, तर कुठे वर्गखोल्यांची दुरवस्था; नंदुरबार तालुक्यातील चित्र

ZP School : नवीन शैक्षणिक वर्षाला जल्लोषात सुरवात करून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होत आहे.

शांताराम पाटील

Nandurbar ZP School : नवीन शैक्षणिक वर्षाला जल्लोषात सुरवात करून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी होत आहे. मात्र काही ठिकाणी शाळांची रंगरंगोटी, तर काही ठिकाणी शाळा इमारतींची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता आदी विविध समस्याही दिसून आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या प्रश्‍नाकडे प्रशासन व पदाधिकारी यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. एकीकडे शासन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वल्गना करीत आहे, तर दुसरीकडे प्राथमिक शाळांची अवस्था दयनीय आहे. ( Zp school start from today in district )

अनेक ठिकाणी शाळा इमारती जीर्ण झाल्या आहेत. काहींचे पत्र उडाले आहेत, ते अद्याप जैसे थे आहेत. काहींचे हवेत वाकलेले पत्रेही सरळ केलेले नाहीत, काही ठिकाणी वर्ग जास्त मात्र शिक्षक कमी असेही चित्र आहे. त्यासाठी रिक्त पदांची भरती करून पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे, शाळेत सुविधा पुरविणे अग्रक्रम ठरतो, मात्र तालुक्यात तसे चित्र दिसून आले नाही. शिक्षक मोठ्या प्रमाणात धडपड करतात, शाळा सजवितात, गुणवत्तावाढीसाठी उपक्रम राबवितात, मात्र त्यासाठी पूरक सुविधा देणे शासन-प्रशासनाचे काम आहे. (latest marathi news)

त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. अनेक शाळांच्या प्रांगणात पावसाचे पाणी तुंबते, शाळांना गळती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्सुकता फारशी दिसून येत नाही. त्यातूनच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आता शहरी भागातील शाळांची वाट धरू लागल्याचे चित्र आहे.

खासगी शाळांमध्ये उत्साह

भालेर येथील क. पु. पाटील विद्यालयासह अनेक खासगी शाळा परिसरात आहेत. शनिवारी शाळा प्रवेशासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच त्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही नवोदिताचे स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षकांनी पुस्तके वितरणासह स्वागताची तयारी केली आहे. मात्र काही ठिकाणी शाळांच्या दुरवस्थेमुळे नाराजीचे सूर उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT