jail  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : दरोड्यातील 6 आरोपींना कारावास! दहा हजारांचा दंड; अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचा निकाल

Latest Crime News : नवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ऑक्टोबर २०१८ ला जळगावहून अहमदाबादकडे सराफ व्यापाराचे पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : जळगावहून अहमदाबादकडे सराफ व्यापाराचे पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनावर सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील सहा आरोपींना नंदुरबार जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षे शिक्षा व प्रत्येकी दहा हजारांचा दंड सुनावला. (Crime 6 accused in robbery jailed)

नवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ऑक्टोबर २०१८ ला जळगावहून अहमदाबादकडे सराफ व्यापाराचे पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनावर सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात फिर्यादी चालक शैलेशकुमार द्वारकाभाई पटेल (वय ३८) अहमदाबाद येथील व्यापाऱ्याकडे चालक म्हणून काम करीत होते.

१० ऑक्टोबर २०२४ ला सराफ व्यापाऱ्याने फिर्यादीस बोलावून जळगाव येथील कार्यालयामधून काही रक्कम घेऊन येण्यास सांगितले असता, फिर्यादी व त्याचा सोबती असे जळगाव येथील कार्यालयात पैसे घेण्यासाठी गेले. तेथून त्यांनी दोन कोटी ४१ लाख ५० हजारांची रोकड स्वतःच्या ताब्यात घेऊन चारचाकी वाहनाने ते पुन्हा अहमदाबादकडे जात असताना नवापूरपासून पाच किलोमीटरवर त्यांच्यामागे एक चारचाकी वाहन ओव्हरटेक करून त्यांच्यासमोर थांबले व त्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम घेऊन फरारी झाले होते. (latest marathi news)

या प्रकरणी नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. नवापूर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक व्ही. एच. राजपूत यांनी गुन्ह्याच तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले व तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. टी. डी. कपाडिया यांनी काम पाहिले. या खटल्यात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली.

त्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी दीपककुमार हसमुख पटेल, अमरसिंग चेनाजी ठाकोर, अक्षयकुमार शैलेशभाई पटेल, राजेश कांजीभाई पटेल, प्रकाशकुमार शांतिलाल पटेल, मेघराज ऊर्फ मेहूल अमर ताजी राजपूत (सर्व रा. गुजरात) असे सहा आरोपींना दहा वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT