kusumagraj esakal
नाशिक

Nashik News: कुसुमाग्रजांनी शिक्षण घेतलेल्या शाळेच्या विकासासाठी 1 कोटी 85 लाखांच्या निधीस मंजुरी

दिलीप बनकरांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महापुरुषांचे मोठे योगदान आहे. तसेच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या व शिक्षण घेऊन समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांच्या शाळांचा विकास करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (1 Crore 85 Lakhs sanctioned for development of school Kusumagraj studied Nashik News)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या ऐतिहासिक गावांतील शाळांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक गावातील शाळा विकास कार्यक्रमांतर्गत आमदार दिलीप बनकर यांनी सुचविलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी साहित्यिक नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज

यांनी शिक्षण घेतलेल्या पिंपळगाव बसवंत येथील शाळा क्रमाक एकच्या विकासासाठी सुमारे एक कोटी ८५ लाख २८ हजार ५७२ इतक्या रुपयाचा निधी मंजूर होऊन नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे, की देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाने विविध उपक्रम राबविले असून,

त्याचाच एक भाग म्हणून २०२२-२३ च्या पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थ व वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या संबंधित १३ ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार राज्यभरातील सुमारे १३ ऐतिहासिक शाळांचा विकास साधण्यासाठी सुमारे १४ कोटी ३० लाख २० हजार इतक्या निधीस नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये निफाड तालुक्यातील शिरवाडे गावाचे भूमिपुत्र व ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रजांनी शिक्षण घेतलेल्या पिंपळगाव बसवंत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकचा विकास व्हावा, यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव बसवंत येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीबाबत व्यथा मांडली.

या शाळेत गरीब व कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेतात, हे प्रकर्षाने मांडले होते व त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. आजअखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले. लवकरच पिंपळगाव येथील कुसुमाग्रजांनी शिक्षण घेतलेली ऐतिहासिक शाळा नवीन रूपात साकारणार आहे.

शाळा विकासासाठी निधीस मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तालुक्याच्या जनतेच्या वतीने आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT