विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Jal Jeevan Mission : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची केवळ २०० कामे पूर्ण असून १ हजार २२ योजनांची कामे प्रगतीत आहे. जलजीवनची कामे अपूर्णतेचा फटका वैयक्तीक नळ जोडणीवर होत आहे.
पाणी योजना पूर्ण झालेल्या नसल्याने नळ जोडणीच्या कामात जिल्हा पिछाडीवर दिसत आहे. (1 lakh 20 thousand pipe connection work is incomplete in district nashik news)
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ लाख ४९ हजार ९४१ नळ जोडणी करण्याचे उद्दिष्टे असताना आतापर्यंत केवळ ३० हजार ६३२ (२०.४३ टक्के) नळजोडणीचे काम पूर्ण झालेले आहे. आगामी तीन महिन्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला १ लाख १९ हजार ३०९ नळ जोडणीचे काम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ पाणी पुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. या १२२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या, पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूर्णत: नवीन असलेल्या पाणी पुरवठा योजनांची संख्या ५४१ आहे.
या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या पाणी पुरवठा योजनेतंर्गतच लोकांना वैयक्तीक नळजोडणी करून द्यायची आहे. पाणी पुरवठा योजनांचा विचार केल्यास डिसेंबरपर्यंत १२२२ योजनांपैकी ९९० योजनांची कामे प्रगतीत आहे. २०० योजनांची कामे आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. ३२ कामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही.
पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा वेग कमी असल्याचा फटका वैयक्तीक नळ जोडणीच्या कामावर होत आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ७ लाख १८ हजार १५२ नळ जोडणीचे उद्दिष्ट्ये निश्चित केलेली आहे. यापैकी गतवर्षात ५ लाख ६८ हजार २११ नळ जोडणीचे काम पूर्ण झालेले आहेत. सन २०२३-३४ या आर्थिक वर्षात १ लाख ४९ हजार ९४१ नळ जोडणी करण्याचे उद्दिष्टे ठेवले होते.
यापैकी डिसेंबर २०२३ अखेर ३० हजार ६३२ जोडणीचे काम पूर्ण झालेले आहे. १ लाख १९ हजार ३०९ नळ जोडणीचे कामे शिल्लक आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ डेडलाईन दिलेली आहे. याचा अर्थ आगामी तीन महिन्यात पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करून नळ जोडणीचे काम करावे लागणार आहे.
प्रशासनाची नाराजी
जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाराजी व्यक्त केलेली असतानाच विभागीय उपायुक्त उज्वला बावके-कोळसे यांनी देखील नळ जोडणीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. पाणी पुरवठा योजना व नळ जोडणीचे कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
''जिल्ह्यात १२२२ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत अखेरची मुदत आहे. या मुदतीत एक हजार योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे नळ जोडणीचे काम देखील त्या वेळात पूर्ण केले जातील. दिलेल्या मुदतीत नळ जोडणी करण्याचे नियोजन केले आहे.''- संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.
तालुकानिहाय नळ जोडणीचे काम
तालुका सन २०२३-२४ उद्दिष्टे पूर्ण झालेली कामे अपूर्ण कामे
सुरगाणा २४७५१ १९७० २२७८१
पेठ १४६९९ २१५८ १२५४१
त्र्यंबकेश्वर १९२८१ २८९४ १६३८७
येवला ११७०२ १७८४ ९९१८
नांदगाव ९१२८ २२७५ ६८५३
इगतपुरी ९५२३ १८५६ ७६६७
मालेगाव १६२४८ २४२३ १३८२५
कळवण ८०७४ ३६७१ ४४०३
चांदवड ६४६९ १७६७ ४७०२
बागलाण ८७३८ २३७८ ६३६०
देवळा २८८४ ७६२ २१२२
सिन्नर ६३७६ १७१४ ४६६२
नाशिक ४३८५ १९७७ २४०८
दिंडोरी ४७८१ १७९८ २९८३
निफाड २९०२ १२०५ १६९७
एकूण १४९९४१ ३०६३२ ११९३०९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.