esakal
नाशिक

जनावरांची चोरटी वाहतूक रोखली

अंबादास देवरे

सटाणा (नाशिक) : मुल्हेर (ता. बागलाण) परिसरातून कत्तलीसाठी चोरट्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप व एका कारसह दहा गायी, तीन वासरे व दोन गोऱ्हे अशा १५ जनावरांची मालेगाव येथील गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून सुटका केली. इतर संशयित फरार झाले असून, एकास अटक करण्यात आली आहे.

मुल्हेर येथून साळवणमार्गे संशयास्पद दोन पिकअप (क्र. एमएच- १५- सीके- ५७४०) व (एमएच- २८- बीबी- २७४), मारूती सुझुकी कंपनीची कार (क्र. एमएच- ०१- एएक्स- २६००) ही वाहने सटाण्याकडे जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.

त्याप्रमाणे सापळा रचून त्यांनी मुल्हेरपासून त्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. आपला कुणीतरी पाठलाग करीत असल्याचा संशय येताच चोरटे व वाहनचालक रस्त्यावर वाहने सोडून पसार झाले. गोरक्षक कार्यकर्त्यांनी सदर वाहने सटाणा पोलिस ठाण्यात जमा केली. वाहनांमध्ये असलेल्या जनावरांसह पोलिसांनी पंचनामा करून पंधरा जनावरांसह वाहने ताब्यात घेतली. पोलिसांनी पिकअप गाडीची तपासणी केली असता १० गायी, ३ वासरे व २ गोऱ्हे अशा १५ जनावरे व वाहनांसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिसांनी आशपाक अहमद निसार अहमद (रा. मालेगाव) यास ताब्यात घेतले असून, जनावरे कत्तलीसाठी मालेगावकडे नेण्यात येत असल्याची संशयिताने कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT