esakal
नाशिक

Nashik Crime News : व्यवस्थापकाने लावला मद्य कंपनीला 10 कोटींना चुना; आर्थिक व्यवहारात फेरफार करीत केली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मद्याचा सेल करणार्या कंपनीत व्यवस्थापक असलेल्या संशयिताने मद्यविक्री दुकानांच्या आर्थिक व्यवहारात फेरफार करत तब्बल १० कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी व्यवस्थापकासह त्याच्या कुटूंबियांविरोधात गंगापूर पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (10 crore fraud to liquor company by manager nashik crime news)

हेमचंद्र मोतीराम चौधरी (५७), रत्ना हेमचंद चौधरी, निलेश हेमचंद चौधरी (२९), मीनल मयुर चौधरी, मयूर हेमचंद चौधरी (सर्व रा. ड्रिम ग्रॅन्डयुअर, मातोश्रीनगर, तिडके कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. सागर विश्वनाथ सुरळकर (रा. नंदुरबार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हेमचंद्र चौधरी हा प्रथम हिरा सेल्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामास होता.

त्याच्यावर शहरातील तीन मद्यविक्री दुकानांच्या व्यवहारांची जबाबदारी होती. त्यासाठी संबंधित दुकान चालकांनी कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करीत ते चौधरीच्या ताब्यात दिले होते. मात्र चौधरी याने दुकानचालकांचा विश्वासघात करीत १० कोटी २९ लाख रुपयांचे धनादेश वटवून ते स्वत:सह कुटूंबातील इतर चौघांच्या बँक खात्यात वर्ग केले.

चौधरी यांनी आर्थिक व्यवहार सविस्तर न देता फक्त व्यवसायासाठी झालेला खर्च, खरेदी व विक्री यांचीच माहिती दिली.

तसेच पैसे व्यवसायातच गुंतवत असल्याचे तो सांगत होता. मात्र व्यवसायाच्या नफा-तोट्यात विसंगती दिसत असल्याने संबंधितांनी चौधरीकडे आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती मागितली असता, त्याने ती दिली नाही.

त्यामुळे चौकशी केली असता चौधरीने तीनही दारु विक्री दुकानांच्या बँक खात्यातून स्वत:सह कुटूंबियांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करून अपहार केल्याचे उघडकीस आले. संशयिताने एप्रिल २०१३ ते मार्च २०२३ या कालावधीत हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT