Water Crisis Sakal
नाशिक

Water Crisis: पाणी असूनही 10 दिवसापासून फिरफिर! जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष, 60 ते 65 गावांना फटका

भाऊसाहेब गोसावी

Water Crisis : चांदवड तालुक्यात दुष्काळात तेरावा महिन्यासारखी स्थिती असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्यात विस्कळितपणा आला आहे.

जीवन प्राधिकरणाच्या स्रोतात पाणी उपलब्ध असूनही गेल्या दहा दिवसांपासून वेगवेगळ्या खोळंब्यांमुळे चौरेचाळीस गाव पाणीपुरवठा योजनेच्या गावांसह टँकरने पाणीपुरवठा सुरू असणाऱ्या गावांचे मोठे हाल सुरू आहेत.

तरीही अधिकाऱ्यांकडून काम होत आहे, करतो आहोत... होईलच.. अशा पद्धतीने उत्तरे दिली जात आहेत. कोणत्याही प्रकारचे युद्धपातळीवर काम केले जात नाही. लोकप्रतिनिधींना या प्रकाराचे गांभीर्य नसल्याचे दिसते आहे. (10 days in spite of water crisis Neglect of Life Authority 60 to 65 villages affected nashik)

पाऊसच नसल्याने तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विहिरीत पाणी नाही, कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने माणसांसह जनावरे ही शासनाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.

तालुक्यातील जवळपास साठ ते पासष्ट गावांना चौरेचाळीस गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा होतो. वीस ते पंचवीस गावांना पंधरवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चांदवड येथील जलकुंभातून या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.

मात्र गेल्या दहा बारा दिवसांपासून टँकरच्या फे-याच पूर्ण होत नाहीत. ज्या गावांना दोन ते तीन खेपा मंजूर आहेत त्यांना एकच खेप होते आहे. तीन- तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना एका दहा बारा हजार लिटरच्या टँकरने काहीच होत नाही.

गावागावात यामुळे पाण्याचे संकट अधिकच वाढले आहे. माणसे पाण्याच्या एका एका हंड्यासाठी अक्षरशः दिवसभर टॅंकरची वाट पाहत असतात. याला जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजन शून्य कारभार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकवीस ऑगष्टपासून कधी लाईटचा, कधी ट्रॉन्सफार्मरचा तर कधी जलवाहिनीची गळती अशा वेगवेगळ्या कारणांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे अधिकारी सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकामागून एक अडचणी येत आहेत, मग अधिकारींबाबत गांभीर्याने पावले उचलत नाहीत का? दुष्काळी परिस्थिती इतकी भयावह असताना पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत का होत नाही? टॅंकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांसारखीच स्थिती योजनेचा पाणीपुरवठा असलेल्या गावांची आहे.

वीस ते पंचवीस दिवस गावांना योजनेचे पाणी मिळत नाही. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष घालून दुष्काळी जनतेला दिलासा द्यावा अशी जनतेची मागणी आहे.

"तालुक्यात दहा बारा दिवसांपासून वेगवेगळ्या खोळंब्यांमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. प्रयत्न करून पाणीपुरवठा सुरळीत केला तर आता देणेवाडीजवळ जलवाहिनी फुटली आहे. लगेचच जेसीबीसह टीम तिथे गेली आहे, तरीही लिकेज काढण्यासाठी दोन दिवस लागतील." - संजय वाघ, उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चांदवड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economist Bibek Debroy Passed Away: अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते

आताच्या दिवाळीत जुनी मजा नाहीच... कुणाला गावी जायची घाई तर कुणाला फटाके उडवायची, कलाकारांनी सांगितल्या आठवणी

Tesla Job: पुण्याच्या इंजिनियरने इलॉन मस्कला पाठवले 300 अर्ज आणि 500 ​​ईमेल; शेअर केला ड्रीम जॉब मिळवण्याचा संघर्ष

Diwali Festival 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त घरोघर अभ्यंगस्नान; आज लक्ष्मीपूजन

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT