Voters esakal
नाशिक

Nashik: जिल्ह्यात 10 हजार शिक्षक मतदार वाढले! नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात 64 हजार 786 मतदारांची नोंदणी

विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर व नाशिक, मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघाची सहा वर्षांची मुदत येत्या ७ जुलै २०२४ ला संपुष्टात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘पैठणी’ दर्शनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकट्या नाशिक जिल्ह्यात यंदा दहा हजार मतदारांची वाढ झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीत १३ हजार ४३९ मतदारांची नोंद झाली होती.

२०२४ च्या निवडणुकीसाठी २३ हजार ६६८ शिक्षक मतदार राहणार आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवरील हरकती निकाली काढण्याची सोमवारी (ता. २५) अंतिम तारीख असून, शनिवारी (ता. ३०) अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येणार आहे. (10 thousand teacher voters increased in district Registration of 64 thousand 786 voters in Nashik Division Teacher Constituency political)

विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर व नाशिक, मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघाची सहा वर्षांची मुदत येत्या ७ जुलै २०२४ ला संपुष्टात येत आहे. नाशिक विभागात नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.

निवडणूक घेण्यासाठी आयोगाने मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात ६४ हजार ७८६ शिक्षक मतदारांची नोंद झाली आहे. प्रारूप मतदारयादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

या हरकती निकाली काढण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत असून, शनिवारी (ता. ३०) अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येईल. २०१८ च्या निवडणुकीत नाशिक विभागातून ५३ हजार ८९२ मतदारांची नोंद झाली होती.

प्रत्येक निवडणुकीसाठी नव्याने नोंदणी करावी लागते. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने मतदार नोंदणी केली. वाढीव मतदानाचा जिल्ह्यातील उमेदवारांना कितपत फायदा होतो, हे येणाऱ्या निवडणुकीतून दिसून येईल.

एका महिन्यात अकरा हजार मतदार वाढले

निवडणूक विभागाने प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर हरकती प्राप्त होण्यापर्यंत म्हणजेच ६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत ११ हजार २१९ मतदारांची नोंदणी झाली.

यातील दहा हजार ६७३ मतदारांची नोंद आता यादीत झाली आहे. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते.

"शिक्षक मतदारांमध्ये जनजागृती करत त्यांच्यापर्यंत नोंदणी फॉर्म, लिंक पोहोचविल्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली दिसते. मतदार नोंदणी अभियानामुळे वर्षभरात साधारणतः एक लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत."-शशिकांत मंगरूळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी (नाशिक)

जिल्हानिहाय मतदार

नाशिक : २३ हजार ६६८

धुळे : आठ हजार २९७

जळगाव : १३ हजार २२९

नंदुरबार : चार हजार ६०७

अहमदनगर : १४ हजार ९८५

एकूण : ६४ हजार ७८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT