nmc google
नाशिक

NMC News: 10 हजार मोकळे भूखंड दुहेरी करातून मुक्त; 16 कोटींचा बोजा रद्द

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिका हद्दीतील दुहेरी कराच्या जाळ्यात अडकलेल्या जवळपास ३१ हजारपैकी १० हजार ११४ मोकळे भूखंडांवर आता एकच कर लागू होणार आहे.

दुहेरी करातून मुक्त झाल्याने महापालिकेच्या सदरी असलेल्या मिळकतींवरील जवळपास सोळा कोटी रुपयांचा बोजा कमी झाला आहे. (10 thousand vacant plots exempted from double taxation 16 crores burden cancelled NMC Nashik)

महापालिकेने मोकळ्या भूखंडावर कर लावल्यानंतर वर्षानुवर्षं कर वसुलीची प्रक्रिया चालू राहते. कर लागू असलेल्या मोकळ्या भूखंडावर पक्क्या स्वरूपाचे बांधकाम होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोकळा भूखंड कर रद्द होणे अपेक्षित आहे.

परंतु घरपट्टी लागू झाल्यानंतर मोकळा भूखंड करदेखील लागू असतो. दुहेरी कर लागू असला तरी मालमत्ताधारकांना यासंदर्भात कल्पना नसते. कल्पना असली तरी फारसे लक्ष दिले जात नाही. मोकळ्या भूखंडावरील कर मात्र कायम दिसतो. ]

मोकळ्या भूखंडावरील इमारतीला घरपट्टी लागू झाल्यानंतर मोकळ्या भूखंडावरील पट्टी वजावट केली जात नाही. कराची थकबाकी व त्यावरील व्याज सातत्याने चढत जाते.

या पार्श्वभूमीवर विविध कर विभागाकडून विशेष मोहीम राबविली. मोहिमेत दहा हजार १५४ मोकळे भूखंडांवरील दुहेरी कर रद्द करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या थकबाकीची रक्कम सोळा कोटी रुपयांनी घटली.

"अनेक वर्षांपासून दुहेरी कराच्या बोजांत अडकलेल्या दहा हजार ११४ मालमत्ता मोकळ्या झाल्या आहेत. यातून सोळा कोटी रुपयांची थकबाकी कमी दिसून येत आहे."

- श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर, महापालिका

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विभागनिहाय दुहेरी कराच्या मालमत्ता (रद्द झालेल्या)

विभाग दुहेरी कर मालमत्ता

सातपूर- ४,३५७ (२३७४)

पश्चिम- ६७२ (३०८)

पूर्व- २,९१२ (१,६१७)

पंचवटी- १३,८५३ (२,०००)

सिडको- ७,५३३ (२,७००)

नाशिकरोड- १,८३६ (१,११५)

-------------------------------------------

एकूण ३१,१६३ (१०,११४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT