वणी (जि. नाशिक) : चिखलआंबे, ता. चांदवड शिवारातील शरद वसंत आमले, यांचे शेत गट नंबर १९५ /१ मध्ये असलेल्या बोअरवेल (Borewell) मध्ये ४०० फूट खोल सोडलेली इलेक्ट्रिक मोटार (Electricity Motor) त्यासाेबत सोडलेली केबल व ४०० फूट पाईप कनेक्शन पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर फेकून दिली. (100 feet water spray from borewell Nashik latest marathi news)
बोअरवेल मधून निघणारे पाणी जमिनीपासून सुमारे १०० फूट उंची पर्यंत 40 मिनिट चालू होते. मागील तीन -चार वर्षात पावसाळ्यात हयाच बोअरवेल मधून चार ते पाच फुट बोअरवेल मधील पाईप बाहेर येवून पाणी बाहेर पडल्याची घटना घडली होती.
मात्र यावर्षी सदर बोअरवेल मधील असलेली मोटरसह अतिशय वेगाने बाहेर फेकून देवून पाण्याचा फवारा उडू लागल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मोटर उंच उडाल्याने मोटरचे दोन तुकडे झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी असलेले चिखलआंबेचे सरपंच अरुण पगार यांनी सांगितले. दरम्यान आज सकाळी सरंपच अरुण पगार, चिखलआंबेचे तलाठी पवार, ग्रामसेवक नागरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.