नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी २७.४३ कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले असून, यापैकी आतापर्यंत एक हजार सभासदांना १०.२५ कोटींचे (३७ टक्के) कर्ज वाटप करण्यात आले आहे. संथगतीने असलेली पीक कर्ज वाटपाची प्रक्रियेला दिवाळीनंतर वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ३९ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील ५१ हजार ५८७ शेतकऱ्यांना ५७९.२४ कोटींचे कर्जवाटपाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे.
यात खरीप हंगामासाठी ५५१.८१ कोटींचे उद्दिष्ट्य होते. यापैकी ५० हजार ६५० शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२२ अखेर ४४६.८२ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. (10.25 crore loan disbursement in district for rabi season from district bank Nashik Agriculture News)
खरिपासाठी सरासरी ८१ टक्के कर्ज वाटप झाले आहे. गतवर्षी ४५९.८८ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा रब्बी हंगामासाठी २७.४३ कोटींचे कर्ज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आतापर्यंत १५४ हेक्टर क्षेत्रावरील ९३७ शेतकऱ्यांना १०.२५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे.तालुकानिहाय विचार करता निफाड तालुक्यात सर्वाधिक १९८ शेतकऱ्यांना २.९४ कोटींचे पीक कर्जवाटप झाले आहे. यापाठोपाठ दिंडोरी १.८० कोटी, त्र्यंबकेश्वर १.१५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
याशिवाय चांदवड ५८.७२ लाख, देवळा १५.९२ लाख, इगतपुरी ५.९३ लाख, कळवण ३३.१२ लाख, मालेगाव ७८.६१ लाख, नांदगाव ४०.१२ लाख, नाशिक २८.१६ लाख, पेठ ७ लाख, सटाणा ७३.७८ लाख, सिन्नर २३.६९ लाख, येवला ७.३० लाख रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे.
यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत जिल्हयात रेंगाळला होता. यात अतिवृष्टी तसेच ढगफुटी देखील झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांना सुरवात केली नाही. दिवाळीनंतर पावसाने उघडीप घेतली असून, खऱ्याअर्थाने पेरण्यांना प्रारंभ होईल. पेरण्यांना वेग आल्यानंतर पीक कर्जाची मागणी देखील वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.