Nashik News : बागलाण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी चालू पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी १०८.५० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी गुरुवारी (ता.२०) दिली.
यावेळी बोलताना दिलीप बोरसे म्हणाले, की तालुक्यातील विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. (108 crores of funds approved for Satana taluka nashik news)
पावसाळी अधिवेशनात शासनाने तालुक्यासाठी भरघोस निधीची घोषणा केली आहे.
बिगर आदिवासी भागातील कामांसाठी एकूण ४६ कोटी ५० लाख रुपये, तर आदिवासी उपयोजनेअंतर्गत रस्ते, पुल व अन्य कामांसाठी ५० कोटी रुपये तर सटाणा शहरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी १२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बिगर आदिवासी भागातील एकूण १४ कामांमध्ये राज्य मार्ग क्रमांक ८ ते मुंगसे या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये, केरसाणे मुल्हेर रस्त्यावरील मोसम नदीवरील पूलासाठी ४.२ कोटी रुपये, पिंपळदर ते जोरण रस्त्यावरील आरम नदीवरील पुलासाठी ६ कोटी रुपये बिगर आदिवासी भागातील दळणवळण सुलभ होण्यासाठी इतर रस्ते व पुलांसाठीही निधीस मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाबार्ड अंतर्गत लाडूद ते जायखेडा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम व कऱ्हे ते कोळीपाडा रस्त्याच्या कामासाठी एकूण ६ कोटी ४ लाख रुपये पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प २०२३-२४ अंतर्गत मंजुरी दिली आहे. तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
आदिवासी उपाययोजनेअंतर्गत ४३ कामांना मंजुरी
रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा, बांधकाम, संरक्षक भिंत व पाइप, मोरीचे बांधकाम, सिमेंट काँक्रिट गटर व संरक्षक भिंत अशा स्वरूपाच्या कामांचा समावेश असून आदिवासी भागातील दळणवळण सुलभ होईल.
तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी १२.१४ कोटी रुपयांच्या निधी मिळाल्यामुळे २५० आदिवासी विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची सोय होऊन विद्यार्थ्यांची परवड थांबणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.