ssc exam  esakal
नाशिक

SSC HSC Supplementary Examination: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट उद्या होणार उपलब्‍ध

सकाळ वृत्तसेवा

SSC HSC Supplementary Examination : इयत्ता दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा येत्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये होणार असून, विद्यार्थ्यांना येत्‍या बुधवारी (ता. ५) प्रवेशपत्र उपलब्‍ध करुन दिले जाणार आहे.

यासंदर्भात राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळा, महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या सुचनापत्रात म्हटल्याप्रमाणे पुरवणी परीक्षांसाठी प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर बुधवारी सकाळी अकरापासून स्‍कूल, कॉलेज लॉगइन येथून डाउनलोड करता येतील. (10th 12th Supplementary Examination hall tickets will be available tomorrow nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तांत्रिक अडचण उद्‌भवल्‍यास शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना ते मोफत देण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. प्रवेशपत्राच्‍या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्‍का व स्‍वाक्षरी असावा. विषय किंवा माध्यम यांमध्ये बदल असल्यास शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन दुरस्ती करावी.

प्रवेशपत्रावरील फोटो, स्‍वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव याबाबतच्‍या दुरुस्‍त्‍या शाळा, महाविद्यालयाच्‍या स्‍तरावर करुन त्‍याची प्रत विभागीय मंडळाकडे सादर करण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

मोठी बातमी! बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा; प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा कधी? वाचा...

Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

SCROLL FOR NEXT