Mahendra Choria, Dr. Vaibhav Patil, Prashant Dabri and others who won the title of Ironman competition held in Goa,  esakal
नाशिक

Goa Ironman Competition : गोव्याच्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचे 11 खेळाडू चमकले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोवा येथे रविवारी (ता. १३) झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत नाशिकच्या अकरा खेळाडूंनी बाजी मारत चमकदार कामगिरी नोंदविली. महेंद्र छोरीया, डॉ. वैभव पाटील, प्रशांत डबरी, अरुण पालवे, डॉ. सुभाष पवार, दीपक भोसले, प्रदिप जाधव, अविनाश पाथरे, राहुल जगताप, रोहन भिंगे, सागर गायकवाड यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. (11 players from Nashik shine in Goa Ironman competition Nashik News)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी जगभरातून १ हजार ४०० खेळाडू सहभागी झाले होते. भारताबाहेरील होणाऱ्या स्पर्धांमध्ये काठिण्य पातळी कमी असते. मात्र गोव्याच्या स्पर्धेत खेळाडूंचा कस लागतो. या स्पर्धेत खेळाडूंना प्रामुख्याने दमट हवामानाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. समुद्रात पोहणे, सायकल चालविणे हे सर्वांत जास्त कठीण होते.

गोव्याच्या मिरामार बीचवर ही स्पर्धा सुरु झाली. थंड प्रदेशात स्पर्धा पूर्ण करणे सोपे असते. मात्र दमट हवामानाच्या प्रदेशात लगेच थकवा जाणवतो. अशा विपरीत परिस्थितीत सगळ्यांना स्पर्धा पूर्ण करताना दमछाक झाली. दोन किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर रनिंग खेळाडूंना पूर्ण करावी लागली. यात नाशिकच्या अकरा खेळाडूंनी याआधीही अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेतही त्यांनी निर्धारित वेळेपेक्षा आधीच स्पर्धा पूर्ण करीत गोवा आयर्नमॅनचा किताब पटकावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT