Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या पहिल्या विशेष फेरीला जेमतेमच प्रतिसाद मिळालेला आहे. तीन नियमित फेऱ्यांनंतरही १४ हजार ९६० जागा रिक्त असताना सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज भरताना विशेष फेरीत सहभाग नोंदविला आहे.
त्यामुळे या फेरीनंतरही दहा हजाराहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याची सध्याची स्थिती आहे. दरम्यान विशेष फेरीची निवड यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध केली जाणार आहे. (11 th admission selection list for special round will be published on 24 july nashik news)
नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध एकूण २७ हजार २४० जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जाते आहे. यामध्ये २३ हजार ९५० जागा प्रवेश फेरीतून तर विविध राखीव कोट्याच्या ३ हजार २९० जागा आहेत.
प्रवेश फेऱ्यातून ११ हजार ०४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असल्याने उर्वरित १२ हजार ९०७ जागा रिक्त आहेत. तर कोट्याच्या जागांवर एक हजार २३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, उर्वरित २ हजार ०५३ जागा अद्यापही रिक्त आहेत.
मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने शिक्षण विभागाकडून पहिल्या विशेष फेरीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागासाठी अर्जाचा भाग दोन भरून लॉक करायचा होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यापूर्वी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु नोंदणीची मुदत संपल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नोंदणी झालेली नसल्याची माहिती समोर येते आहे.
जेमतेम साडे पाच हजार विद्यार्थ्यांनीच विशेष फेरीत सहभाग नोंदविल्याचे सध्याचे चित्र आहे. यापैकी फेरीतील जागांसाठी ४ हजार ४८७ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल असून, कोट्याच्या जागांसाठी ९९७ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेले आहेत.
यापूर्वीचा अनुभव पाहता, सहभागी विद्यार्थ्यांतून निवड होणाऱ्यांची संख्या कमीच असते. यातून विशेष फेरीनंतरही दहा हजाराहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याची सध्याची स्थिती आहे. विशेष फेरीची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. २७) पर्यंत मुदत दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.