11th admissions process esakal
नाशिक

Nashik 11th Admission : विशेष फेरीत कट ऑफची घसरगुंडी..! 4 हजार 293 विद्यार्थ्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेत खुल्‍या प्रवर्गाच्‍या अनुदानित जागेसाठी यापूर्वीचा कट ऑफ नव्वद टक्क्‍यांपर्यंत गेलेला असताना, पहिल्‍या विशेष फेरीत मात्र घसरण झाली आहे.

सोमवारी (ता. २४) जाहीर झालेल्‍या निवड यादीत कट ऑफची घसरगुंडी झाल्‍याचे बघायला मिळाले. दरम्‍यान यादीत चार हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, प्रवेशासाठी गुरुवार (ता. २७)पर्यंत मुदत दिली आहे. (11th admission first special admission round cut off fell nashik news)

शिक्षण विभागातर्फे राबविलेल्‍या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत तीन नियमित फेऱ्यांनंतरही अकरावी प्रवेशाच्‍या १२ हजार ९२५ जागा रिक्‍त राहिल्‍या. या जागांवर प्रवेशासाठी पहिली विशेष फेरी राबविली असून, अवघ्या चार हजार ४८७ विद्यार्थ्यांनी या फेरीत सहभाग नोंदविला होता. यापैकी चार हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून, त्‍यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे.

दरम्‍यान, यापूर्वी पहिल्‍या व दुसऱ्या गुणवत्ता यादीत शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्‍या अनुदानित जागेसाठी खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ नव्वद राहिला होता. तिसऱ्या यादीत नव्वद टक्क्‍यांहून अधिक कट ऑफची नोंद झालेली होती.

मात्र विशेष फेरीत हा कट ऑफ खालावला आहे. बहुतांश नामांकित महाविद्यालयांमध्ये अनुदानित जागांवर प्रवेश झालेले असून, विनाअनुदानित, स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावरील जागांवर प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना प्राधान्‍य दिले जाऊ लागले असल्‍याचे बोलले जाते आहे.

पहिल्‍या विशेष फेरीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांची स्‍थिती अशी-

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाखा अर्ज केलेले विद्यार्थी निवड झालेले विद्यार्थी

विज्ञान २,२३६ २,११५

वाणिज्‍य १,२९४ १,२५६

कला ८५० ८१५

एचएसव्‍हीसी १०७ १०७

सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

पहिला प्राधान्‍यक्रम मिळालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार ७८० आहे. ३७८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्राधान्‍यक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तिसऱ्या प्राधान्‍यक्रम मिळालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या सत्तर आहे.

महाविद्यालयाचे कट ऑफ असे -

(विज्ञान शाखेच्‍या अनुदानित जागेसाठी)

महाविद्यालय टक्‍केवारी

आरवायके ८०

केटीएचएम ७१.४

भोसला महाविद्यालय ७१.२

व्‍ही. एन. नाईक (विनाअनु) ६३.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT