11th Admission : अकरावी प्रवेशासाठी तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. फेरीत सहभागासाठी विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी मंगळवार (ता. ८)पर्यंत असेल.
नियमित जागांसह कोट्याच्या जागांसाठीही प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. (11th Admission Opportunity till tomorrow for third special round Procedure for all types of seats nashik)
नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या झाल्या. सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
अद्याप १० हजार ३०७ जागा रिक्त असल्याने आणखी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शिक्षण विभागाने तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. या फेरीत सहभागासाठी मंगळवारी (ता. ८) सायंकाळी सहापर्यंत वेळ असणार आहे.
यापूर्वी नोंदणी न केलेल्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करून अर्जाचा भाग दोन भरता येईल. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरून लॉक करताना फेरीत सहभागी होता येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कोट्यांतर्गत रिक्त जागांचे प्रमाण लक्षणीय असून, या जागांवरही निर्धारित मुदतीत प्रवेशासाठी अर्ज सादर करता येईल.
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक ः
- नोंदणीची मुदत- ८ ऑगस्टपर्यंत
- गुणवत्ता यादी प्रसिद्धी- १० ऑगस्ट
- प्रवेशासाठी मुदत- १० ते १२ ऑगस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.