Teacher esakal
नाशिक

Nashik News : 1200 शिक्षक अन् शिक्षकेतरांना मिळणार अनुदानाचा लाभ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात नाशिक जिल्हयातील ३२ माध्यामिक व उच्च माध्यामिक आणि २० प्राथमिक शाळांना तसेच ६५६ तुकडयांना अनुदान मिळणार आहे. त्याचसमवेत १२०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना यांचा लाभ मिळणार आहे. (1200 teachers and non-teachers will get benefit of subsidy nashik Latest Marathi News)

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचा-यांची मागणी होती. याशिवाय शिक्षक आमदार किशोर दराडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील हा प्रश्न विधिमंडळात लावून धरला होता. यासाठी आमदार दराडे व डॉ. तांबे यांनी पुणे ते मंत्रालय पायी दिंडी देखील काढली होती.

यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत अनेकदा बैठका झाल्या. अखेर मंगळवारी (ता.१३) मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळांना ११०० कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने राज्यातील ६ हजार १० प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४ हजार ८६२ तुकडयांना अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर ६३ हजार ३३८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या निर्णयामुळे नाशिक जिल्हयातील २० टक्के अनुदान घेत असलेल्या ३२ शाळांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे. तर, ४० टक्के अनुदान घेत असलेल्या ८ शाळांना ६० टक्के अनुदान देण्यात येईल. मूल्याकंनानुसार अनुदानास पात्र परंतू, शासनस्तरावर अद्याप घोषित न केलेल्या १०९ शाळांना २० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. प्राथमिक विभागातील २० शाळांना अनुदान मिळणार आहे. याशिवाय माध्यमिकच्या १४१व प्राथमिकच्या ४२५ अशा एकूण ५६५ तुकडयांना अनुदान मिळणार आहे. याचा लाभ या शाळांमधील १ हजार १९२ शिक्षक आणि शिक्षकतेर कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.

"विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यासाठी पुणे ते मंत्रालय पायी दिंडी देखील काढण्यात आली होती. अखेर शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील ९ हजाराहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना होणार आहे. तसेच २ हजाहारून अधिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, तुकडयांना देखील अनुदान मिळणार आहे."- किशोर दराडे, आमदार, नाशिक शिक्षक मतदारसंघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT