Poltry Harmed by cloudburst rain esakal
नाशिक

ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा; उजनीत 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील उजनी येथे सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तासभर बरसलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने बंधाऱ्याच्या सडव्यावरून प्रचंड वेगाने वाहणारे पाणी पोल्ट्री फार्ममध्ये शिरले. सुमारे 12 हजार कोंबड्यांचा यामुळे तडफडून मृत्यू झाला.

पूर्ण वाढ झालेल्या या कोंबड्या येत्या दोन दिवसांत सव्वाशे रुपये किलो दराने विक्री करण्याचे नियोजन होते. मात्र निसर्गाने घात केल्यामुळे सदर शेतकऱ्याचे सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (12000 chickens died due to cloudburst Rain in Ujani Nashik Latest Marathi News)

उजनी गावाशेजारी असलेला बंधारा महिनाभरा पूर्वीच पावसाच्या पाण्याने भरला असून सांडव्या वरून पाण्याचा प्रवाह सुरू होता. सोमवारी सायंकाळी अचानक बरसलेल्या जोरदार पावसामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होऊन प्रचंड वेगाने सांडव्यावरून वाहणारे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसले.

या सांडव्यालगतच मच्छिंद्र भिमाजी शिरसाट (लोहार) यांच्या शेती गट क्रमांक 147 मध्ये पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी शिरसाठ यांनी 12 हजार कोंबड्या दीड महिन्यापासून पाळलेल्या होत्या. पोल्ट्री शेड मध्ये अचानक पाणी शिरल्याने या सर्व कोंबड्यांचा नाकातोंडात पाणी जाऊन तडफडून मृत्यू झाला. शेडच्या चहुबाजूने पाण्याचा वेडा पडलेला होता.

गुडघाभर पाण्यातून वाट काढत श्री. शिरसाट रात्री शेडमध्ये पोहोचल्यावर मृत कोंबड्यांचा खच पडल्याचे आढळून आले. कोणत्याही कंपनीशी करार न करता शिरसाठ यांनी स्वतः 45 रुपये नग याप्रमाणे पक्षी विकत घेऊन दीड महिन्यापूर्वी 12 हजार कोंबड्या शेडमध्ये टाकल्या होत्या. या कोंबड्यांच्या संगोपनासाठी त्यांनी खाद्य व औषधांवर देखील खर्च केला होता.

एका कोंबडीचे वजन सरासरी अडीच किलोच्या आसपास झाल्यावर त्यांनी 125 रुपये किलो प्रमाणे विक्री करण्याचे नियोजन केले होते. त्या संदर्भात एका कंपनीसोबत त्यांचे बोलणे देखील झाले होते. मात्र तत्पूर्वीच निसर्गाने त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कोंबड्यांचे विक्रीतून सुमारे 35 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शिरसाठ यांना खात्री होती.

तीन एकर टोमॅटो पाण्याखाली...

शिरसाट यांचे पोल्ट्री शेड शेजारीच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या क्षेत्रात तीन एकरात लागवड केलेले टोमॅटोचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. या शेतीतून नुकतेच टोमॅटो उत्पादन सुरू झाले होते. दोन दिवसांपूर्वीच पहिला तोडा करण्यात आला होता. ढगफुटी सदृश पावसाने आजूबाजूच्या सर्वच शेतांमध्ये पाणी साचल्याने व पाण्याचा निचरा होण्याची शक्यता नसल्याने टोमॅटो शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील शिरसाठ कुटुंब यांना पाणी सोडावे लागणार आहे.

शेती पिकांचे मोठे नुकसान

उजनी परिसरात सततच्या पावसामुळे शेती पिकांची मोठी हानी झाली आहे प्रशासनाकडून गेल्या पंधरवड्यात पिकांच्या नुकसानीच्या पंचनामाचे आदेश दिले होते मात्र केवळ आठवडाभराचीच मुदत त्यासाठी देण्यात आली असल्याने व नुकसानीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांचे पंचनामे करणे शिल्लक आहे महसूल यंत्रणेने तातडीने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून पंचनामे करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी उजनी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT