Heavy Rain Crop Damage latest marathi news esakal
नाशिक

नाशिक : अतिवृष्टीमुळे 1241 हेक्टरची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात ९ ते १२ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये (Heavy rain) १ हजार २४० हेक्टर ६० आर क्षेत्रावरील पिकांची (Crops damage) दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये सोयाबीन, मका, भात, भुईमूग, भाजीपाला आणि उसाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान कळवण आणि त्याखालोखाल निफाड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. (1241 hectare grain loss due to heavy rain nashik latest monsoon Marathi News)

खरीपामध्ये कापूस आणि उसासह ६ लाख ५६ हजार ४९० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ४ लाख ४२ हजार ३२५ हेक्टर पेरण्या आणि लागवड झाली आहे. त्यात भाताचे ४ हजार ८४३, मक्याचे २ लाख ६ हजार ८८५, भुईमुगाचे १७ हजार ३४९, सोयाबीनचे ८६ हजार २७१, उसाचे ५ हजार ३९५ हेक्टरचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ११८ गावांमधील २ हजार ९४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित गावांची आणि फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी : बागलाण-३-५, कळवण-४३-१ हजार ८७५, देवळा-४-६०, दिंडोरी-३३-१२६, सुरगाणा-१४-८९, निफाड-२१-७९०.

अतिवृष्टीमध्ये तालुकानिहाय पिकांच्या झालेल्या नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे : बागलाण : मका-२, भुईमूग-१. कळवण : मका-२५०.१०, सोयाबीन-४७२.३०. देवळा : मका-४०. दिंडोरी : सोयाबीन-५८, भाजीपाला-२५. सुरगाणा : भात-५२.२०. निफाड : मका-९०, सोयाबीन-२१०, भाजीपाला-१५, ऊस-२५. असे एकूण जिल्ह्यातील मक्याचे ३८२.१०, भाताचे ५२.२०, भुईमुगाचे १, सोयाबीनचे ७४०.३०, भाजीपाल्याचे ४०, उसाचे २५ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.

तालुकानिहाय पिकांचे झालेले नुकसान

(आकडे हेक्टरमध्ये दर्शवितात)

बागलाण-३

कळवण-७२२.४०

देवळा-४०

दिंडोरी-८३

सुरगाणा-५२.२०

निफाड-३४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT