नाशिक : मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर पुनर्नियोजनात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून मार्चअखेरच्या दिवशी आरोग्य, अंगणवाड्या, शिक्षणांसह रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
अंगणवाड्यांसाठी ४.४० कोटी, आरोग्य विभागांतर्गत आदिवासी विभागासाठी चार कोटी तर, दुरुस्त्यांसाठी चार कोटी, असा एकूण आठ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
रस्ते दुरुस्ती, लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधाऱ्यांसाठी, तसेच जनसुविधांतर्गत देखील कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. (125 crore bills of Zilla Parishad in the treasury 8 crore fund received for health Nashik ZP News)
जिल्हा परिषद लेखा व वित्त विभागात शुक्रवारी (ता. ३१) बिले जमा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आतापर्यंत लेखा विभागाने सायंकाळी सातपर्यंत १२५ कोटींची बिले ट्रेझरीमध्ये जमा केली आहेत. बिले जमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला नियमित नियतव्यय प्राप्त झाले. त्यानंतर निधी पुनर्नियोजनात निधी पदरात पाडून घेण्यासाठी यंदा लोकप्रतिनिधीमंध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, ठराविक आमदार वगळता अनेकांच्या पदरी निराशा पडल्याचे बोलले जात आहे.
लोकप्रतिनिधीऐवजी ठेकेदारांना निधी दिल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी गत काही दिवसांपासून यासाठी विविध मार्गांनी पालकमंत्री भुसे यांच्याकडे फिल्डिंग लावल्याचे बोलले जात होते. शुक्रवारी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेला पुनर्नियोजनात निधी वर्ग करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
याबाबतची प्रत्यक्ष आकडेवारी प्राप्त झालेली नाही. परंतु प्रामुख्याने जिल्ह्यातील ४५ नवीन अंगणवाड्यांसाठी ४.४० कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन निधी वर्ग झाला आहे. आरोग्य विभागाला आदिवासी भागातील आरोग्य केंद्र उभारण्यासाठी चार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
तसेच, याच विभागासाठी चार कोटींचा निधी मिळाला आहे. यातून प्रामुख्याने दुरुस्तीसाठी हा निधी असल्याचे समजते. पुनर्नियोजनात पालकमंत्री भुसे यांनी विशेष ग्रामीण भागात, तसेच आपल्या मालेगाव विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले.
निधी उपलब्ध झालेला असताना बिले जमा करण्याचे काम जोरात सुरू होते. गत तीन दिवसांत लेखा विभागाने १२५.५० कोटींची बिले जमा केलेली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बिले जमा करण्याची मुभा असल्याने बिले जमा करण्याचे काम सुरू होते. तसेच, विकासकामांसाठी आणखी निधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.