Child Marriage : महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत १ एप्रिल ते २ मे दरम्यान जिल्ह्यात तब्बल १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
यात नाशिक तालुक्यातील १, सिन्नर १, बागलाण २, त्र्यंबकेश्वर ७, इगतपुरी २ यांचा समावेश आहे. बालविवाह रोखण्यात येत असल्याने ग्रामस्थ पुढे येत असल्याचे चित्र आहे. (13 child marriages prevented in district within month campaign to prevent child marriage nashik zp news)
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालकल्याण विभागाला बालविवाह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
त्याअनुषंगाने महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी विशेष मोहीम राबवत पहिल्या टप्प्यात बालविवाह करू नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह होणार असल्याचे कळल्यास तक्रार कुठे करावी, याबद्दल जनजागृती करण्यात आली.
यासंदर्भात गावांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम देखील घेण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा प्रशासनाकडे बालविवाहांसंदर्भात गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने कारवाई करत महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात १३ बालविवाह रोखले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यात नाशिक व सिन्नर तालुक्यातील प्रत्येकी १, बागलाण व इगतपुरी प्रत्येकी २ तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ७ बालविवाह रोखण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात कुठेही बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.