Ration Shop esakal
नाशिक

Nashik: येवल्यासह तालुक्यात नवे 13 रेशन दुकाने! तहसिल कार्यालयाकडून अकार्यान्वित दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यात १३ गावांत नव्याने स्वस्त धान्य दुकाने होणार आहेत. यासाठी तहसिल कार्यालयाकडून अकार्यान्वित दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तालुक्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या १३ अकार्यान्वित रास्त भाव दुकानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्या सूचनेनुसार तहसीलदार आबासाहेब महाजन यांनी दिली. (13 new ration shops in taluka with Yeola Tehsil Office published notice for non functioning shops Nashik)

शहरातील पाच तसेच तालुक्यातील दहेगाव पाटोदा, न्याहारखेडे बु., पिंपळगाव जलाल, देवदरी, धनकवाडी, भिंगारे, गुजरखेडे, पिंपळगाव लेप अशा एकूण १३ नवीन रास्त भाव दुकानांचा जाहीरनामा गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जाहीरनामा ज्या भागासाठी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच भागातील ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास या प्राधान्यक्रमानुसार नवीन स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी मंजूर केले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रास्त भाव दुकान ज्या गटास चालविण्यासाठी घ्यावयाचे असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयाकडून अर्ज शुल्क भरून प्राप्त करून घ्यावेत.

अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसील कार्यालय येवला येथे समक्ष ३१ जुलै २०२३ ला सायंकाळी पाचपर्यंत सुटीचे दिवस वगळून सीलबंद पाकिटात सादर करावेत.

त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे अशी माहिती तहसीलदार महाजन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT