चांदवड - तालुक्यातील बोपाने येथील तेरा वर्षीय ह.भ.प. ओम (सुयोग) शरद हांडगे याने नर्मदा परिक्रमाचे ५५ दिवसात ३८०० किलोमीटरचे खडतर अंतर सायकलवर मजल करीत नर्मदा परिक्रमापूर्ण केली.
ओमच्या जिद्दीला व त्याच्यात असलेल्या अध्यात्मिक शक्तीला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती त्याच्या वडिलांकडून ओमचे वडील चांदवड येथील महावितरण कंपनीत कार्यरत आहेत.
त्यांनी २१ जानेवारी ते २६ एप्रिल ह्या कालावधीत स्वतः नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली होती हेच बाळकडू ओम ने आपल्या वडिलांकडून घेऊन सर्व ध्येय आत्मसात केल्यावर नर्मदा परिक्रमा मलाही करायची अशी मनीषा बाळगली होती. (13 year old om complete 3800 km Narmada Parikrama on a bicycle nashik news)
आणि त्याचे त्याने परिक्रमाचे स्वप्न सत्यात उतरवून सायकल वर एकट्याने अत्यंत कमी वयात अवघ्या १३ वर्षाच्या चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या ओम ने महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात सुमारे ३८०० किलोमीटरचे अंतर फक्त ५५ दिवसात आपल्याबरोबर बिछाना व इतर साहित्य बरोबर घेऊन २१ ऑक्टोबर २०२२ रोजी नर्मदा परिक्रमापूर्ण करण्यासाठी हाती घेतलेले ध्येय "नर्मदे हर हर" या घोषणेने नर्मदा माता परिक्रमेला सुरुवात केली होती.
त्याने अनेक भयानक अडचणीचा सामना करण्यातून मार्गक्रमण करत करत आपला परिक्रमामार्ग हा शोधत शोधत अर्ध्यावर एक विपरीत प्रसंगाला तोंड देत ज्याच्या भरवश्यावर आपली धुरा आहे अशी आपली सायकल चोरीला गेली मनाला अत्यंत दुःख झाला पण हा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या समस्त ग्रामस्थानी सर्वांच्या मदतीने ओमला नवी सायकल घेऊन प्रदक्षिणा पूर्णत्वाकडे वाटचाल करन्यास मदत केली ओमला अस वाटले जणू काही नर्मदामातेने च मदत केली अशावेळी कुठलाही मनाला खेद न बाळगता न घाबरता,डगमगता संयमाने ही परिक्रमा १६ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण केली.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
आपल्या हांडगे परिवाराबरोबरच सम्पूर्ण बोपाने गावाचा चांदवड तालुक्याचे व नाशिक जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदन होत आहे अशा आदर्शवद कर्तृत्व अर्थात नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल गावातून ओंकार महाराज यांची रथावर बसून मिरवणूक काढण्यात आली यावेळी वारकरीभूषण ह.भ.प.ज्ञानेश्वरमाऊली शिंदे,रामकृष्णहरी ज्ञानसाधना आश्रम रुई यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते ,यावेळी प्रथम संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधि संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे,तिसगांव यांच्या शुभहस्ते ओम महाराज हांडगे यांचे संतपूजन करण्यात आले.
यावेळी संतसेवक ह.भ.प.दत्तू काका राऊत,तुकाराम महाराज वाजे,संजय महाराज ठाकरे,शाम महाराज गांगुर्डे,निळोबा महाराज बोरसे,अर्जुन महाराज गांगुर्डे,रमेश महाराज गांगुर्डे, दौलत महाराज ठोंबरे,संजय आव्हाड सर जी डी खैरनार सर,अनिल सोनवणे सर,भामरे मॅडम तुकाराम काळे,राजेंद्र महाराज काळे,रतन महाराज ठोंबरे,शिवाजी नाना शिंदे,ओंकार महाराज वडील शरद हांडगे आजोबा वाळूबा हांडगे काका नानाभाऊ हांडगे,कार्यक्रम यशस्वीकरिता माणिकराव हांडगे,निवृत्ती ठाकरे,दिपक बिडवे,विष्णू गांगुर्डे, ज्ञानेश्वर पगार,गणेश राजनोर,प्रशांत खुंटे,गोकुळ हांडगे,संदीप हांडगे,व समस्त बोपाणे येथिल ग्रामस्थ,भजनी मंडळ ,महिला,तरुण मंडळ,बाल गोपाळ परिश्रम घेऊन सहकार्य लाभले व परिसरात दिघवद,तिसगांव, हिवरखेडे, उर्धुळ,परसूल,काजीसांगवी,निमगव्हान,गणुर,पाथरशेंबे इ येथील भजनी मंडळ उपस्थित होते, ओंकार महाराज यांचे जिल्हातिल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले आहेत.ह.भ.प.संजय महाराज ठाकरे यांनी सूत्रसंचालन करत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.