Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात कत्तलीसाठी येणारी 14 गायी मुक्त; 2 वाहनासह साडेसहा लाखाचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करून आणण्यात येणारे १४ गोवंश तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने जप्त केले. पोलिस पथकाने १४ गोवंश, दोन बोलेरोसह सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज जप्त केला.

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील शेंदुर्णी फाटा व मुंबई-आग्रा महामार्गावरील पाटणे शिवार या दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. (14 cows coming for slaughter in the city freed 2 vehicles including six half lakhs seized Nashik Crime News)

शहरात कत्तलीसाठी जनावरे आणण्यात येत असल्याची माहिती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, विलास जगताप यांनी पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी उपनिरीक्षक मोहित मोरे, पोलिस शिपाई गोरख आहेर, सचिन गायकवाड, प्रल्हाद देवरे, शिरोळे, शिंदे, बागूल यांना आदेश दिले.

पोलिसांनी दोन वेगवेगळे पथक करून शेंदुर्णी शिवारात सापळा रचून सायंकाळी बोलेरो पिकअप (एमएच ०४ डीएफ २४६१) पकडून तीन गाय, दोन गोऱ्हे व बोलेरो पिकअप जप्त केली. अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार झाला. चालकाच्या साथीदाराने बबलू कुरेशी या कसाईकडे जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती दिली.

महामार्गावरील पाटणे शिवारात पहाटे अडीचच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी बोलेरो पिकअप (एमएच ०९ बीसी १३१९) अडविण्याचा प्रयत्न केला. चालकाला थांबविण्याचा इशारा केला असता त्याने चालू वाहनातून उडी टाकत हॉटेल सुखसागर येथील झाडाला ठोस मारुन वाहन धडकवले.

चालक फरार झाला. चालकाच्या साथीदाराने पिकअप मधील जनावरे आरिफ फैजुल्ला खान यांच्याकडे कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी नऊ गोवंश, बोलेरो पिकअप जप्त केली.

पाटणे येथील कारवाईत ६६ हजाराचे गोवंश, अडीच लाखाची बोलेरो असा तीन लाख १६ हजाराचा तर शेंदुर्णी येथील कारवाईत ७० हजाराचे गोवंश, दोन लाख ७० हजाराची बोलेरो पिकअप असा तीन लाख ४० हजाराचा तर एकूण ६ लाख ५६ हजाराचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणी अस्लम शेख कुरेशी, आरिफ फैजुल्ला खान (रा. मोमीनपुरा), वाहनचालक अय्युब, त्याचा साथीदार शोएब (पुर्ण, नाव, पत्ता नाही), अल्ताफ शेख रशीद (रा. पिलखोड) तसेच चालक लतीफ टकल्या, बबलू कुरेशी या सात जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम तसेच मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT