Nikhil Kulkarni Sakal
नाशिक

नाशिकच्या पंधरावर्षीय निखिलला स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप

अरुण मलानी

थोर भारतीय गणिततज्‍ज्ञ रामानुजन यांच्या सन्मानार्थ स्पिरिट ऑफ रामानुजन (स्टेम) टॅलेंट इनिशिएटिव्हद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. नाशिकच्‍या १५ वर्षांच्या निखिल कुलकर्णी यास या वर्षीचा स्‍पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिपचा बहुमान मिळाला आहे

नाशिक : थोर भारतीय गणिततज्‍ज्ञ रामानुजन यांच्या सन्मानार्थ स्पिरिट ऑफ रामानुजन (स्टेम) टॅलेंट इनिशिएटिव्हद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. नाशिकच्‍या १५ वर्षांच्या निखिल कुलकर्णी यास या वर्षीचा स्‍पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिपचा बहुमान मिळाला आहे. (15 year old nikhil Kulkarni from nashik has received the spirit of ramanujan fellowship)


या उपक्रमातून जगभरातील उदयोन्मुख अभियंते, गणितज्‍ज्ञ आणि वैज्ञानिकांना आर्थिक अनुदान आणि मार्गदर्शनाची संधी दिली जाते. या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संशोधकांना जगभरातील संशोधन कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी किंवा स्वीकृत प्रायोजकांसह वैयक्तिक संशोधनासाठी पाच हजार डॉलरपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. स्पिरिट ऑफ रामानुजन टॅलेंट इनिशिएटिव्हचे अध्यक्ष, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे उपाध्यक्ष आणि व्हर्जिनिया विद्यापीठातील गणिताचे प्रा. केन ओनो आहेत.

गणित आणि विज्ञानामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व संशोधनात रुची असणाऱ्या जगभरातील ६० विद्यार्थ्यांना आजपर्यंत ही फेलोशिप देण्यात आली आहे. निखिल त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर रँडमाइज्ड अल्गोरिदम शिकण्यासाठी तसेच त्यासंबंधी संशोधनासाठी करणार आहे. निखिलचे शालेय शिक्षण सिम्बायोसिस स्कूलमध्ये झाले असून, तेथील शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशात भामरे तसेच रेझिंग अ मॅथेमॅटिशियन या संस्थेचे सचिव विनय नायर यांचेही मार्गदर्शन लाभले. भारतीय गणित ऑलिंपियाडमध्ये तसेच इतर अनेक गणितीय स्पर्धांमध्ये निखिलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला गणित शिकविण्याचीही आवड आहे. त्याच्या इतर आवडींमध्ये खगोलशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक वादविवाद यांचा समावेश आहे.



संगणक विज्ञान आणि गणितावर संशोधन करणार

१५ वर्षीय निखिलला या वर्षीची स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप पुरस्कृत केले आहे. तो संगणक विज्ञान आणि गणितावर संशोधन करणार आहे. ही फेलोशिप मिळविणारा निखिल दहावा भारतीय विद्यार्थी आहे.

(15 year old nikhil Kulkarni from nashik has received the spirit of ramanujan fellowship)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT