Accident  esakal
नाशिक

Sakal Exclusive : शहरात रस्ता अपघाताचे 9 महिन्यात 150 बळी; हेल्मेट नसल्याने 26 जणांचा मृत्यू

नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : शहरात रस्ता अपघातांत गेल्या ९ महिन्यांमध्ये १५० जणांचा बळी गेला आहे. वाढते अपघात चिंतेचे विषय असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तरुण चालकांचा हकनाक बळी जात आहे.

सप्टेंबरअखेर १५० जणांचा रस्ते अपघातामध्ये बळी गेला आहे. प्रशस्त रस्ते शहराच्या विकासाचे चित्र रंगवते आहे, तर दुसरीकडे भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांनी तेच रस्ते रक्तरंजित होत आहेत. (150 death of road accidents in 9 months)

पोलिसांकडून हेल्मेटसक्तीसह नानाविध उपक्रमांसह उपाययोजना केल्या जात असतानाही नाशिक शहर अपघाती मृत्यू शहरासाठी चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबरअखेर शहरातील विविध ठिकाणी ३६५ अपघातांच्या घटना घडल्या.

या नऊ महिन्यांमध्ये १५० जणांना रॅश ड्रायव्हिंगमुळे प्राण गमवावे लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या अपघातातील मृत्यू झालेल्यांमध्ये ९४ दुचाकीस्वाराचा समावेश आहे. तसेच त्यातही हेल्मेट परिधान न केल्यामुळे २६ दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले.

दोष कुणाचा, रस्ते की वेग?

शहराचा विकास मूलभूत सोयीसुविधातून दिसतो. तसाच प्रशस्त रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. नाशिकच्या रस्त्यांची नेहमीच तारीफ होत असताना, याच रस्त्यांवर नवनवीन प्रकारची भरधाव वेगात धावणारी वाहने धावताहेत. तीही सीट बेल्ट न लावता, हेल्मेट न वापरता. वेगावरील नियंत्रण सुटते आणि अपघाती जीव जातो.

यात एका कुटुंबातील व्यक्ती जाते, आधार जातो. चांगले रस्ते ही काळाची गरज आहे, तसेच मर्यादित वेग राखणे प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे व वेगाची मर्यादा राखल्यास अपघात टाळता येऊ शकतो, तरी दोष कुणाचा, हा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जातो.

प्राणांकिंत अपघातांचे विवरण (सप्टेंबरअखेर)

अपघाताचे कारण.................अपघात.....मृत्यू

* रॅश ड्रायव्हिंग ...................५५..........५७

* धोकादायक वाहन चालविणे......५२.........५६

* ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह..........००............००

* राँगसाईड ड्राईव्ह..........४.................४

* विनाहेल्मेट...............२४.............२६

* अन्य कारणे............६.................०७

एकूण :...............१४१.............१५०

अपघात..........मयत..........जखमी (सप्टेंबरअखेर)

* पादचारी......३८..............७६

* सायकलस्वार......६..........३

* रिक्षाचालक/प्रवासी.....४..........१५

* लाइट व्हेईकल/प्रवासी.....६.........३४

* ट्रकचालक..........१...........५

* ट्रक/टँकर प्रवासी.......००..........००

* ट्रॅक्टर प्रवासी.......१..........००

* दुचाकीस्वार.........९४..........२२२

एकूण.............१५०.............३५५

वयानुसार अपघातांचे विवरण (सप्टेंबर अखेरपर्यंत)

वय..............मयत (स्त्री)........मयत (पुरुष)..........एकूण

१ ते ८........०४...................०२...........६

९ ते १७......००..........०५............०५

१८ ते २५.....००...........३६............३६

२६ ते ३४........०३..........२८............३१

३५ ते ४४........०४.........२८..........३२

४५ ते ५४..........०३..........१३.........१६

५५ ते ६४.........०२...........०७.............०९

६५ ते ७०.........०१.............०७...........०८

७१ वर्षावरील....०२..........०५.........०७

एकूण : ..........१९.......१३१.........१५०

''रस्ता अपघातांमध्ये सर्वाधिक बळी हे रॅश ड्रायव्हिंगचे आहेत. वाहन आणि रस्ते चांगले आहेत, म्हणून बेदरकारपणे वाहन चालविणे योग्य नाही. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केले तरीही अपघात व अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात.

वाहतूक शाखेकडून सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. बेशिस्तांवर कारवाईदेखील केली जाते. मात्र अपघात रोखायचे असेल तर स्वत:पासून काळजी घेणे गरजेचे आहे.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT