नाशिक : कोरोनामुळे महापालिकेने वैद्यकीय विभागातील रिक्त पदाबरोबरच अतिरिक्त स्टाफ नियुक्त करण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ३५० पदांसाठी तब्बल एक हजार ५४२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या मुलाखतीतून पश्चिम महाराष्ट्र व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांनी हजेरी लावली. (1500 interviews for 350 posts in the health department of the corporation)
फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या मुलाखतीकडे पुन्हा एकदा उमेदवारांनी पाठ फिरविली आहे. कोरोना तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी प्रशासनाने ऑक्सिजन बेडची सज्जता, ऑक्सिजन पुरवठा, औषधांचा साठ्याची तयारी केली आहे. पायाभूत सुविधा पुरविताना मनुष्यबळाचीदेखील आवश्यकता आहे. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ मानधनावर भरण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मुलाखती सुरू आहे. नर्स पदासाठीच्या दोनशे जागांसाठी ९४९ उमेदवारांनी मुलाखत दिल्या, स्टाफ नर्सच्या ५० पदांसाठी ४९, एमडी मेडिसीनच्या ३२ जागांसाठी दहा उमेदवार, एमबीबीएसच्या ४० जागांसाठी ४४ उमेदवार, एक्सरे टेक्निशियन च्या तीन जागांसाठी ३६, ईसीजी टेक्निशियन च्या सात जागांसाठी दहा, हॉस्पिटल मॅनेजर पदासाठी १२ जागांसाठी ४४ उमेदवारांनी मुलाखत दिली. भुलतज्ज्ञांची सहा जागांसाठी एकही उमेदवाराने मुलाखत दिली नाही.
(1500 interviews for 350 posts in the health department of the corporation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.