tap connections esakal
नाशिक

NMC Water Tap Connection: नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे 157 अर्ज; थेट कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

NMC Water Tap Connection : पाण्याची गळती तसेच पाण्याच्या थेंब अन्‌ थेंबाचा हिशोब घेण्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांना नळजोडण्या अधिकृत करण्यासाठी अमलात आणलेल्या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याने आता थेट कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करण्यासाठी अवघे १५७ अर्ज आले आहेत. (157 Applications for NMC Tap Connection Official Deciding to take direct legal action nashik news)

नाशिक महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. परंतु ज्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो, त्या प्रमाणात वसुली होत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती असल्याचा संशय आहे.

त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्चदेखील देयकांमधून मिळत नाही. त्यामुळे महापालिकेकडून हिशोब बाह्य पाणी शोधण्यांबरोबरच अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी अभय योजना जाहीर केली.

१ मेपासून सदर योजना लागू झाली आहे. शहरात एकूण पावणेपाच लाख मिळकती आहे, त्यापैकी अवघे दोन लाख नळ कनेक्शन आहे. यात जवळपास २५ हजाराहून अधिक नळजोडण्या अनधिकृत असल्याचा संशय आहे.

त्यामुळे अभय योजना अमलात आणली आहे. अभय योजनेची मुदत १५ जूनपर्यंत आहे. मात्र, आत्तापर्यंत अवघे १५७ अर्ज नळजोडण्या अधिकृत करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहे. १५७ अर्जांपैकी ५८ अर्ज मंजूर करण्यात आले असून, ९९ अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता कारवाईच्या पावित्र्यात

२०१७ मध्ये अभय योजना लागू करण्यात आली होती, त्या योजनेअंतर्गत चौदाशे नळजोडणी अधिकृत करण्यात आल्या. या योजनेत २८ लाख २१ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता. आताच्या दुसऱ्या अभय योजनेत मात्र प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे आता थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. अभय योजना संपुष्टात आल्यानंतर अनधिकृत नळजोडणी शोधली जाईल. अनधिकृत नळजोडणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

सदर रक्कम घरपट्टीवर बोजाच्या स्वरूपात वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर नळजोडणी कायमस्वरूपी बंद करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.

असा होईल दंड (रुपये)

नळजोडणी आकार घरगुती बिगर घरगुती व्यावसायिक

१५ मी.मी. ५४०० १९,८०० २४,३००
२० मी.मी. ९,९०० ४७,५२० ५३,४६०
२५ मी.मी. २१,६०० १,१८,८०० १,१६,६४०
४० मी.मी. ६३,००० ३,१६,८०० ३,४७,२००
५० मी.मी. १,१५,२०० ७,९२,००० ६,२२,०८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT