Accident news esakal
नाशिक

Nashik Accident Cases: वर्षभरात शहरात रस्ते अपघातांत 194 बळी; सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे

रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी समुपदेशनही केले जात आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या वर्षभरामध्ये शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शहरात रस्ता अपघातांचे ४७३ गुन्हे घडले आहेत. यात गेल्या १२ महिन्यातील या अपघातांत १९४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाढते अपघात चिंतेची बाब असून, वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळेच वाहनचालकांचा हकनाक बळी जातो आहे.

शहरातील प्रशस्त रस्ते विकास दर्शवीत असला तरी, दुसरीकडे भरधाव वेगातील वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांनी तेच रस्ते रक्तरंजित होत आहेत, हे मात्र दुर्दैव.

दरम्यान, रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी समुपदेशनही केले जात आहे. (194 killed in road accidents in city during year Bike riders highest number of deaths Nashik News)

गेल्या जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांसह उपनगरी रस्त्यांवर ४७३ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या वर्षभरामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे ११८ दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राज्यात रस्ता अपघातांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्युमध्ये नाशिक आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी स्टेट हायवेचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या उपस्थितीत राज्यातील महामार्ग पोलिस अधिक्षकांची संयुक्त बैठक नाशिकमध्ये पार पडली होती.

त्या वेळीही अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधनात्मक उपाययोजनांसह जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अपघात नियमांच्या उल्लंघनामुळेच

वाहनचालक सीटबेल्ट न लावता, हेल्मेट न वापरता वाहने चालवितात. परिणामी, वेगावरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतो.

मर्यादित वेग राखणे प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे व वेगाची मर्यादा राखल्यास अपघात टाळता येऊ शकतो, असे वारंवार सांगितले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानेच अपघातांना निमंत्रण मिळते आहे.

रस्ता अपघातांची आकडेवारी (वर्ष २०२३)

अपघात..........मयत..........जखमी

* पादचारी......५३.............९८

* सायकलस्वार......६..........३

* रिक्षाचालक/प्रवासी.....६........२०

* लाइट व्हेईकल/प्रवासी....८.........४३

* ट्रकचालक........२...........५

* ट्रक/टँकर प्रवासी.......१..........००

* ट्रॅक्टर प्रवासी.......१..........००

* दुचाकीस्वार........११८..........२९८

एकूण.............१९४.............४७३

रस्तेनिहाय अपघातांची आकडेवारी (वर्ष २०२३)

रस्त्यांचे प्रकार...... अपघात....... मयत

- राष्ट्रीय महामार्ग......७९.........८५

- राज्य महामार्ग........०५.........०५

- इतर रस्ते..............१०१.......१०४

एकूण ...................१८५........१९४

"रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांचे समुपदेशन केले जातेच. मात्र सदरचा उपक्रम वर्षभर सुरू असतो. दंडात्मक कारवाईही केली जाते. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन आणि वेगावर नियंत्रण ठेवले तरीही अपघात टाळता येऊ शकतो. वाहनचालकांना आवाहन आहे की आपले जीवन सर्वांसाठीच अनमोल आहे. त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे."- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT