2 arrested for smuggling gavthi pistols esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी पिस्तुलची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकसह धुळे परिसरामध्ये चोरीछुप्या रितीने गावठी पिस्तुलांची तस्करी करून विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना शहर गुन्हेशाखेच्या दरोडा-शस्त्रविरोधी पथकाने अटक केली आहे. (2 arrested for smuggling gavthi pistols nashik crime news)

अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांविरोधात दोन वर्षांपूर्वीच मोक्काअन्वये कारवाई करण्यात आल्याचे समोर येते आहे.

अमन राजेंद्र उजैनवाल (२५, रा. जयभवानी रोड), राहुल अजय उजैनवाल (२३, रा. फर्नांडिसवाडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुलीसह दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) या दोघा संशयितांविरोधात कारवाई करण्यात आली होती. अमन आणि राहुल हे पांडवलेणी परिसरातील फाळके स्मारक परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या शस्त्रविरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक किरण रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, श्रीशैल सवळी, महेश खांडबहाले, कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रवीण चव्हाण आणि महिला अंमलदार मनिषा कांबळे यांनी सापळा रचून दोघा संशयितांना शिताफीने जेरबंद केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त केली असून, १ लाख १० हजारांची बुलेट दुचाकी (एमएच १५ एचई ४१९८) जप्त करण्यात आली. धुळे येथील बडे, विजय सरजित बेहनवाल उर्फ छंगा आणि किरण (रा. फर्नांडिसवाडी) यांच्याकडून संशयित पिस्तुलाची खरेदी-विक्री करीत असल्याचे तपासातून समोर येते आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार, गेल्या जानेवारीत कार्यान्वित करण्यात आलेल्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने सदरील कामगिरी बजावली आहे. आयुक्तांकडून नेमलेल्या पथकांचा आढावा घेत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची तंबीच देण्यात आलेली आहे. त्यामुळे चारही पथकांकडून शहरात धडक कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hitendra Thakur: "विनोद तावडे हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती भाजपनेच दिली"; हितेंद्र ठाकूरांनी तावडेंच्या समोरच केला मोठा आरोप

Vinod Tawde Vs BVA: हॉटेल मध्ये काय चाललं होतं? 5 कोटी वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT