Police Arrested Criminal esakal
नाशिक

Nashik Crime: एका संशयिताकडून 2 दुचाकी हस्तगत; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास मिळाले आहे. या संशयितांकडून पंचेचाळीस हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोलिस हवालदार महेश नांदुर्डीकर करीत आहेत. (2 bikes seized from one suspect Performance of Panchavati Crime Investigation Team Nashik Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर रोडवरील राहणारे मोहनलाल पटेल दुचाकीहून पंचवटीतील कपालेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी शनिवार (ता.०४) ला दुपारी अडीच वाजता आले होते.

त्यावेळी पटेल यांनी रामकुंड परिसरात पार्क केलेली होंडा ट्विस्टर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. नाशिक शहरात वाढती दुचाकी चोरी बघता संबधित पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे उकल करण्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचवटी गुन्हे शोध पथक तपास करीत होते.

त्यावेळी एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित चोरीची दुचाकी घेऊन पाटालगत असलेल्या रस्त्याने जात आहे. पंचवटी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून संशयित पकडण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकी सोडून पळ काढू लागला.

मात्र , शिताफीने संशयित जगदीश अरुण मोरे ( वय ३८,रा. चांदवड ) यास ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

संशयित जगदीश मोरे यांचेकडून चोरीच्या दोन दुचाकी असा एकूण पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या संशयिताविरुद्ध नाशिक ग्रामीण हद्दीत वडनेर भैरव, सटाणा, वणी या भागात दरोडा, जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी बजाविली कामगिरी

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सपकाळे, पोलिस निरीक्षक (प्रशासन)बगाडे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार कुनाल पचलोरे, गोरख साबळे, नितीन पवार अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT