robbery esakal
नाशिक

Nashik Crime News : घरफोड्यांत 2 लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला. यापप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. (2 lakhs worth goods stolen in burglary Nashik Crime News)

पहिला प्रकार अशोका मार्गावर उघडकीस आला. बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६८ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोने चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. अशोका मार्गावरील कल्पतरूनगर येथे अजिंक्य मुकूंद जोशी (रा.ओमकार बंगला,कल्पतरू नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

जोशी कुटूंबिय गेल्या सोमवारी (ता.२३) कामानिमित्त पुणे येथे गेले असता ही घटना घडली. चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६८ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दुसऱ्या घटनेत भद्रकालीतील दुधबाजार भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी महागडे तीन मोबाईल चोरून नेले. नमाज पठण करण्यासाठी कुटुंब गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजीम शकिल तांबोळी (रा.हेलबावडी मस्जीद समोर,दुधबाजार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तांबोळी यांचे कुटूंबिय बुधवारी (ता.२५) त्यांच्या घरासमोरील मस्जीदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले असता चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जींगला लावलेला अ‍ॅपल,सॅमसंग आणि नोकीया या कंपन्याचे सुमारे ५७ हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल चोरून नेले.

मोबाईल ओरबडला

तिसऱ्या घटनेत त्र्यंबकरोडवर रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. पुष्कर भरत बोरकर (३३ रा.कोकन भवन,कामटवाडारोड) गेल्या रविवारी (ता.२२) सातपूर येथून ते त्र्यंबकरोडने पायी त्याच्या घराकडे जात असतांना सकाळ सर्कल ते आयटीआय दरम्यान ते मोबाईलवर बोलत घराकडे पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे २० हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT