Seized Stuff esakal
नाशिक

Nashik Crime News : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या 2 पिकअप गाड्या वणी पोलीसांनी पकडल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापुर फाटा परिसरात पोलीसांनी सापळा लावून कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप गाड्या काही वेळाच्या फरकाने पोलिसांनी पकडल्या. यात गायी, वासरे, बैल असे एकुण १२ गोवंशच सह ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. (2 pick up trucks carrying animals for slaughter caught Nashik Crime News)

वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने त्यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलिस कर्मचारी कुणाल मराठे, अण्णा जाधव, कमलेश देशमुख,भगवान उदार, सुनिल ठाकरे, किरण धुळे यांनी आज ता. १८ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास लखामपूर फाटा सापळा लावण्यात आला होता.

कोशिंबे मार्गे नाशिक कडे जाणारे दोन पिक अप एमएच ४३ बीबी ०७५६ व एमएच ०४एचडी ५५५७ या दोन पिकअप गाडी पकडल्या पंधरा ते वीस मिनिटाच्या फरकाने गाड्या पकडल्या आहे.

यामध्ये जनावराचे पाय तोंड बांधुन निर्दयीपणे कत्तली साठी नेत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी पिकअप चालक कादिर अकिल नाईकवडे ,रा. जामुनमाथा, ता. सुरगाणा, जुबेर हुसेन शेख, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा याना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दोन पिक अप गाडी व १२ गोवंश जातीचे जनावरे हस्तगत केले.

एकुन ९,८४००० रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील जनावरांची सुटका करून वणी येथील गोशाळेत सोडण्यात आले. सुरगाण्याच्या परिसरातुन अनेकदा कत्तली साठी नेण्यात येणारी जनावर पकडली जातात.

पुर्वी वणी मार्गे ही अनेक कारवाया झाल्या आहे. आता जनावरांची चोरटी वाहतूक ही करंजखेड, कोशिंबे या मार्गाने होत असल्याने पोलिसांनीही या मार्गावर ग्रस्त वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

Aurangabad Central Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रदीप जैस्वाल यांचा विजय, एमआयएम, ठाकरे गटाला धक्का

SCROLL FOR NEXT