scrap caught fire esakal
नाशिक

Nashik : भंगाराच्या 2 दुकानांना आग

राजेंद्र बच्छाव

सिडको (जि. नाशिक) : अंबड लिंक रोड केवल पार्क येथील दोन भंगाराच्या दुकानांना (Scrap shop) आग लागल्याने लाखो रुपयांचे प्लॅस्टिक (Plastic) व साहित्य जळून खाक झाले. शेजारच्या मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यानेदेखील (Waste) पेट घेतल्याने बराच वेळ ही आग धुमसत होती. (2 scrap shops Caught Fire Nashik News)

शनिवारी (ता.२८) दुपारी ही आग लागली. या वेळी बाजूलाच मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात भंगार प्लॅस्टिक, लाकडी फळ्या, पुठ्ठे व इतर साहित्य पडले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या भूखंडावर ही आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन सिडको, सातपूर व अंबड एमआयडीसी येथून चार बंब दाखल झाले. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्‍यांना यश आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे रवींद्र लाड, इस्माईल काजी, फायरमन अविनाश सोनवणे, सोमनाथ शिंदे, कांतिलाल पवार, शुभम मोरे, शुभम लाड, सचिन लोखंडे यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT