2 sets of koradi off Electricity generation from third set of Nashik news esakal
नाशिक

Nashik News : कोराडीचे 2 संच बंद; नाशिकचा तिसरा संचातून वीज निर्मिती

नीलेश छाजेड

Nashik News : विदर्भातील कोराडी येथील दोन संच व आयडियल कंपनीचे संच बंद पडल्याने येथील वीज केंद्रातील तिसरा संच ही आज सकाळी प्रज्वलित करण्यात आला. सायंकाळी यातून निर्मिती सुरू झाली. (2 sets of koradi off Electricity generation from third set of Nashik news)

एकीकडे उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यातील विजेची मागणी वाढती आहे. सध्या २८ हजारावर मेगावॉट मागणी पीक हावरमध्ये असते. अशात कोराडी येथील ६६० चे २ संच बॉयलर ट्युब लिकेजमुळे बंद आहे.

नाशिकच्या एका संचाचा कोळसा ज्या आयडियल कंपनीला वळविण्यात आला होता, तो संचही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने नाशिकचा तिसरा संच सुरू करण्यात आला. हा संच सुरू करण्यासाठी मुख्यालयाकडून व भातसा वीज प्रकल्प येथून मनुष्यबळ बोलाविण्यात आले आहे.

२०२० मध्ये मुंबई अंधारात गेली तेव्हा नाशिक चे तिन्ही संच बंद ठेवण्यात आले होते. मात्र ग्रीडसाठी नाशिकचे स्थान महत्त्वाचे असल्याने युद्ध पातळीवर संच सुरू करण्यात आले व मुंबईत दिवे पेटले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज ही आणीबाणीची वेळ आली तर नाशिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे व आज तिसरा संच प्रज्वलित करण्यात आला. आजवर ज्या- ज्या वेळी महानिर्मिती अडचणीत आली त्या- त्या वेळी नाशिक ने मोलाची कामगिरी बजावली आहे. २०१६ पर्यंत नाशिकने सलग चार वर्ष प्रथम तीन क्रमांकावर स्थान अबाधित ठेवले होते.

येथील संच आता चाळिशीच्या उंबरठ्यावर असल्याने येथील प्रस्तावित संच ६६० मेगावॉट होणे अपेक्षित होते, परंतु राजकीय इच्छा शक्ती अभावी येथील प्रकल्प बारगळला आहे. सध्या तीन पैकी दोन संचामधून वीजनिर्मिती सुरू होती, आज तिसरा ही संच सुरू झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

राज्यात विजेची मागणी

आज दुपारी चार वाजता राज्यात विजेची मागणी २७,६५० मेगावॉट होती. नाशिक २७६ मेगावॉट, कोराडी ६९७,खापरखेडा ९९३, पारस ४१३, परळी ६१५, चंद्रपूर १७५९, भुसावळ ८७४ मेगावॉट अशी सुरू होती. तर महानिर्मिती ८०६८ मेगावॉट, खासगी ७६४८ मेगावॉट निर्मिती सुरू होती. तर सेंट्रल कडून १०८०० मेगावॉट वीज घेऊन गरज भागवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT