2 thousand officials will come from across state Successful preparations for Thackeray Group Shivsena state convention esakal
नाशिक

Shivsena Thackeray Group News: राज्यभरातून सुमारे 2 हजार पदाधिकारी येणार! शिवसेनेच्या राज्य अधिवेशनाची जय्यत तयारी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनाला अनेकार्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यव्यापी अधिवेशन मंगळवारी (ता. २३) नाशिकमध्ये होते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनाला अनेकार्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल ड्रेमोक्रॉसी याठिकाणी राज्यव्यापी अधिवेशनासाठीची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच, अधिवेशनानंतर सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.

या सभेचीही तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शहरातील शिवसेनेचे नेत, पदाधिकारी व शिवसैनिक शक्तीप्रदर्शनासाठी जोमाने कामाला लागले आहेत. (2 thousand officials will come from across state Successful preparations for Thackeray Group Shivsena state convention Nashik)

गोल्फ क्लब येथे शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी व्यासपीठ उभारणीचे सुरु असलेले काम.
शिवसेना (ठाकरे गट) च्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने मायको सर्कल येथे सजविण्यात आलेले वाहतुक बेट.

शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होते आहे. नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु शिवसेनेत फुट पडल्यानंतर बालेकिल्लाही दोन गटामध्ये विभागला गेला आहे.

असे असले तरीही उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यव्यापी अधिवेशन त्र्यंबकरोडवरील हॉटेल ड्रेमोक्रॉसी याठिकाणी मंगळवारी (ता. २३) सकाळी अकरा ते दोन यावेळेत होणार आहे.

या अधिवेशनासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, रवींद्र मिर्लेकर यांच्यासह नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

हॉटेल ड्रेमोक्रॉसी येथे होणार्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे दोन हजार पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे खासदार, आमदारांसह नेते, उपनेतेही या अधिवेशनात सहभागी होत आहेत.

अधिवेशनासाठीची जय्यत तयारी हॉटेल ड्रेमोक्रॉसीच्या भव्य सभागृहात करण्यात आली आहे. या सभागृहाच्याच पाठीमागे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तर, हॉटेलच्या प्रांगणांमध्ये अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर ‘रामजन्मभूमीतच शिवसेनेचा वाघ’ हे डिजीटल प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे.

बाबरी मशिद पाडण्याचे आंदोलन व त्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी आपले अनुभव याठिकाणी व्यक्त केल्याचे व्हिडिओ दाखविले जात आहेत. तसेच, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांच्या चित्रफितीही या प्रदर्शनात दाखविल्या जात आहेत.

जागोजागी स्वागताचे फलक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारीच (ता.२२) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी (ता. २३) सकाळी ते अधिवेशनासाठी त्र्यंबकरोडने हॉटेल ड्रेमोक्रॉसी येथे दाखल होतील.

त्यांच्या स्वागतासाठी त्र्यंबकरोडवर ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. भगव्या झेंड्यांमुळे हॉटेलचा परिसरही भगवामय झाला आहे. वाहतूक भेटांनाही भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT