nmc esakal
नाशिक

Traffic Management : कोंडी टाळण्यासाठी मुंबई नाक्यावर 2 अंडरपास; रस्ता सुरक्षा समिती बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात वाहतुकीची समस्या बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता दुकानांसमोर लागणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची जबाबदारीदेखील दुकान मालकांची राहणार आहे. त्यासंदर्भात शहरातील दुकानदारांना महापालिकेकडून लवकरच जाहीर सूचना दिली जाणार आहे.

तर, मुंबई नाका सर्कलवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन अंडरपास तयार करण्याच्या सूचना रस्ता रस्ता सुरक्षा समिती बैठकीत करण्यात आल्या. (2 underpasses at Mumbai Port to avoid congestion Decision of road safety committee meeting Traffic Management nashik News)

रस्ता सुरक्षा समितीची त्रैमासिक बैठक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात झाली. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्टसिटी सीईओ सुमंत मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पीडब्लूडीचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, रेजिलिएंट इंडिया कंपनीचे राजीव चौबे व प्रियांका लखोटे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने आदी उपस्थित होते.

मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे दोन अंडर पास मार्ग असावेत, एकेरी मार्ग करावा, एसटीची वाहतूक वळवावी अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. गतिरोधक बसविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

समितीमध्ये महापालिका, एनएचएआय, पीडब्लूडी, आरटीओ, पोलिस विभागातील अधिकारी आणि के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने या सर्वांचा समावेश राहील.

ट्रक टर्मिनस विकासाचा पुर्नरुच्चार

गतिरोधक बसविल्यास अपघात कमी करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिल्या. शहरात ट्रक टर्मिनस विकसित करण्याची आवश्‍यकता असल्याचा पुर्नरुच्चार करण्यात आला.

शहरात ब्लॅक स्पॉटचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, ३४३ ठिकाणी अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. इंदिरानगरजवळील उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बोगदा कामाला तीन ते चार महिन्यात सुरवात होईल, अशी माहिती न्हाईचे बी. एस. साळुंखे व डी. आर. पाटील यांनी दिली.

ब्लॅक स्पॉट दुरुस्तीसाठी निविदा

शहरातील २६ ब्लॅक स्पॅाटपैकी मुंबई- आग्रा महामार्गावर सहा, पुणे महामार्गावर चार, औरंगाबाद रोडवर चार, पेठ रोड व दिंडोरी रोडवर प्रत्येकी एक, त्र्यंबक रोडवर तीन व महापालिका रस्त्यावर सात असे ब्लॅक स्पॉट आहेत.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

ब्लॅक स्पॉटवर सुधारणा करण्यासाठी दोन दिवसांत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पायलट टेस्टिंग म्हणून पोलिस, महापालिका व रेसिलिएंट इंडिया संयुक्तपणे सिव्हीरीटी इंडेक्स ई- एन्फोर्समेंट सिस्टिमची पडताळणी करणार आहेत.

सात नवीन सिग्नल

शहरातील सर्व सिग्नल यंत्रणेची जबाबदारी महापालिकेच्या विद्युत विभागाने घेण्याची सूचना आयुक्तांनी केली. शहरात एकूण ४७ सिग्नल असून महापालिकेचे ४० सिग्नल आहेत. काट्या मारुती, मखमलाबाद नाका, सेवाकुंज, संतोष टी पॉइंट, स्वामिनारायण चौक, वडाळा नाका, पाथर्डी फाटा हे सात सिग्नल तातडीने सुरू केले जाणार आहे.

पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी वाहतूक पोलिसांना सिग्नलजवळ विश्रांतीसाठी शेड तयार करण्याची सूचना केली. सामाजिक दायित्वाच्या निधीतून शेड उभारणी केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

On This Day: भारताने २०१९ साली कसोटी क्रिकेटमध्ये केला होता हा विक्रम; ऑस्ट्रेलियाला टाकले होते मागे

Jupiter Red Spot : गुरू ग्रहावरच्या 'रेड स्पॉट'मध्ये दिसली अनोखी हालचाल, शास्त्रज्ञही आश्चर्यचकित,नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT