bike thief & police esakal
नाशिक

तपोवनात पाठलाग करून दुचाकी चोरट्यांना अटक; 4 दुचाकी, 17 मोबाईल जप्त

नरेश हाळणोर

नाशिक : तपोवन परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांना हटकले असता, पलायन करणाऱ्यांना गस्ती पथकाने पाठलाग (Chasing) करून अटक केली. परप्रांतीय संशयित दोघांकडून चोरीच्या चार दुचाकी (stolen Bikes) आणि १७ मोबाईल (mobile), असा १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 wheeler thieves arrested in bike chasing by police at Tapovan 4 bikes 17 mobiles seized Nashik news)

महम्मद सद्दाम मारूफ खान (२३, रा. जि. सिद्धार्थनगर, उ. प्रदेश), मेहताब अली करमदार खान (२२, रा. करमा, भानपूर, उ.प्रदेश), अशी संशयितांची नावे आहेत. आडगावचे गुन्हे शोध पथकाचे सुरेश नरवडे, नीलेश काटकर, वैभव परदेशी, सचिन बहिकर यांनी तिघा संशयितांना हटकले असता, त्यांनी पलायन केले. पथकाने पाठलाग करून महम्मद व मेहताब खान यांना पकडले, तर तिसरा फरार झाला. पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे २२ हजारांचे तीन मोबाईल सापडले. चौकशीतही ते काही बोलत नसल्याने त्यांच रेकॉर्ड तपासले असता त्यांच्यावर अंबड व घोटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आल्यानंतर पाच गुन्ह्यांची उकल झाली. त्यांच्याकडून चोरीच्या ९८ हजारांच्या चार दुचाकी व ८० हजारांचे १७ मोबाईल असा १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. फरार संशयित सल्लाउद्दीन आयुब याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT