Soybeans lost due to lack of rain. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : आमदनी आठ्ठन्नी, खर्चा रुपया! सणासुदीत सोयाबीन उत्पादक आर्थिक संकटात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agriculture News : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात मान्सून जोरदार न बरसल्याने शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. .खरीप पेरणीपासूनच पुरेशी ओल नसताना शेतकऱ्यांनी पेरणी केली. यातील २० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. लागवडीपासून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या सर्व पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.

प्रतिकूल परिस्थितीत कीड आणि रोगांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पिकांवर झाला. फुलगळ होणे, शेंगा परिपक्व होण्याआधी सुकून जाणे, बुरशीजन्य रोगांमुळे पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन मिळावे, यासाठी दीर्घ कालावधीच्या वाणांची पेरणी केली. पाण्याअभावी शेंगा पोसल्या नाहीत. पापड्या झाल्याने दाण्यांची भरदार वाढ झाली नाही. (20 percent of farmers faced problem of double sowing nashik news)

ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढल्याने पीक १० ते २० दिवस लवकर काढणीस आले. या सर्वांचा परिणाम होऊन सोयाबीन आणि मका या मुख्य पिकांच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिक घट येत आहे. सिंचनाची सोय नसलेल्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नफा देणारे खरीप पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. यामुळे शेतकऱ्यांची सर्वाधिक भिस्त या पिकावर होती. हवामानातील बदल, पावसात पडलेल्या खंडामुळे कापणी, मळणीचा खर्चही अंगावर येत आहे. सोयाबीनचे बाजारभाव सरासरी ४ ते ५ हजारांच्या आसपास आहेत. दरात झालेली घसरण आणि उत्पादनात आलेली घट. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकरी केलेला उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही.

सोयाबीन उत्पादन खर्च प्रतिएकर

नांगरणी : २५०० रुपये

इतर मशागत : २५०० रुपये

पेरणी : १५००

बियाणे : २५००

तणनाशक, कीडनाशक : २५००

खत : १५००

सोंगणी : ५ हजार

मळणी : २ हजार

वाहतूक : एक हजार

एकूण खर्च : २१ हजार

मिळालेले उत्पन्न

चार क्विंटल × बाजारभाव सरासरी ४ हजार = १६ हजार

"सोयाबीनच्या बाजारभावात खूप घसरण झाली असून, हमीभावापेक्षा कमी दराने सध्या खरेदी होत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी कांदा, टोमॅटोचे बाजारभाव पाडण्याचे प्रयत्न केले. सोयाबीन बाजारभावात सुधारणा करण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करून शेतकऱ्यांनाही आधार द्यावा अथवा शासकीय मदत व पीकविम्याच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यावी." -धर्मराज घोटेकर, शेतकरी, खेडलेझुंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT