सातपूर (जि. नाशिक) : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी टपाल (पोस्ट) विभागाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेल्या नाशिक कार्यालयात विविध योजनांद्वारे सुमारे दोनशे कोटींचे क्लेरिंग हाउस केले जात असल्याची माहिती नाशिक पोस्ट कार्यालयाचे मुख्य पोस्टमास्तर व जनसंपर्क अधिकारी संदेश बैरागी यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना दिली.
कुटुंबाच्या आर्थिक बचतीचे नियोजन कसे करावे, यासाठी ब्रिटिशांनी सुरू केलेले पोस्ट कार्यालय आज देशातील कानाकोपऱ्यात केवळ संवादाचेच काम करत नाही, तर विविध बचतीच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तळागाळातील नागरीकांना बचतीबरोबरच विमा व निवृत्तिवेतनाची सेवा देत आहे. (200 crore clearing house at Nashik Post Office top in maharashtra nashik Latest Marathi News)
त्यात नाशिक टपाल कार्यालय हे देशात पाचवे, तर महाराष्ट्रात अव्वल गणले जाते. यासाठी मुख्य प्रबंधक अधीक्षक एम. एस. अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी काम करत असल्यामुळे हा बहुमान मिळाला आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपली सेवा देण्याची जाणीव ठेवून काम केले जात असल्याचे श्री. बैरागी यांनी सांगितले.
या आहेत टपाल विभागाच्या योजना
- सेव्हिंग बँक : पाचशे रुपयांत सेव्हिंग बँक खाते उघडून त्याद्वारे चार टक्के व्याजही दिले जाते. त्यात चेकबुकची सुविधा ही दिली जाते.
- त्यात १०० रुपयांत ऑनलाइन बँकिग व आयपीबी सुविधा घेऊन ‘फोन पे’सारखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- पंतप्रधान सुरक्षा योजना फक्त २० रुपयांत दोन लाखांपर्यंतचा विमा योजना.
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना यात वय १८ ते ५० वर्षे
- कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास ४३६ रुपये वार्षिक हप्ता भरून दोन लाखांचा विमा
* मासिक प्राप्ती योजना : एकदम रक्कम भरून व्याज घ्या.
मर्यादा एकल खाते साडेचार लाखांपासून पुढे, तर संयुक्त खात्यात नऊ लाखांपासून
अडचण असल्यास एक वर्षात खाते बंद करण्याची मुभा
भविष्यनिर्वाह निधी योजना : मुदत १५ वर्षे, वर्षात कमीत कमी पाचशे रुपये भरू शकता, वय १८ ते ७०, जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरू शकता, पाच वर्षांत एकदा रक्कम काढू शकतो. प्राप्तिकराची सूट
*नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : कमीत कमी एक हजार कमाल मर्यादा नाही. मुदत पाच वर्षे.
* डाक जीवन विमा : विमा संरक्षण मर्यादा ५० लाख, सरकारी, निमसरकारी, बँक कर्मचारी, व्यावसायिकांसाठी, वय १९ ते ५५
कमी हप्त्यात जास्त बोनस, प्राप्तिकराची सूट, पोस्टाच्या बचत खात्यातून अॅटो डेबिट
*सुकन्या समृद्धी योजना : वय ० ते १० वर्षे सुरवातीला २५० रुपये. नंतर ५० च्या पटीने तर जास्तीत जास्त दीड लाख, खाते उघडण्यापासून १५ वर्षे भरणे खात्याची मुदत २१ वर्षे, मुलीचे वय १८ वर्षे किंवा मुलगी दहावी पास झाल्यावर ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधा, प्राप्तिकरात सूट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.