नाशिक : कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने नोव्हेंबर महिन्याची सुरवात काहीशी दिलासादायक राहिली आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात २०३ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. या कालावधीत दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. रविवारी (ता.७) सायंकाळी जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ६९४ होती.
गुरुवारी (ता.४) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा दैनंदिन अहवाल जारी केला नव्हता. तसेच काल (ता.६) भाऊबिजनिमित्त अहवाल जारी करण्यात आला नाही. दरम्यान चार दिवसांच्या एकत्रित परीस्थितीचा विचार करता, जिल्ह्यात या कालावधीत २०३ कोरोना बाधित आढळून आले. गुरुवारी नाशिक शहरात ४४, ग्रामीणमध्ये ५८, मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच, तर जिल्ह्या बाहेरील बारा रुग्णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी (ता.५) नाशिक महापालिका क्षेत्रात आठ, ग्रामीणमध्ये सोळा तर जिल्हा बाहेरील पाच रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काल (ता.६) आढळलेल्या ३२ बाधितांपैकी अकरा नाशिक शहरातील, सतरा नाशिक ग्रामीणमधील तर जिल्हा बाहेरील चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. रविवारी (ता.७) नाशिक शहरातील चोवीस, नाशिक ग्रामीणमधील २८ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
दोन बाधितांचा मृत्यू
कोरोना बळींची घटलेली संख्या दिलासादायक आहे. गेल्या चार दिवसांत दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी प्रत्येकी एक मृत नाशिक शहर व ग्रामीणमधील आहे. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आठ हजार ६८५ वर पोहचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.