22 houses burnt down in Malegaon Nashik Fire Accident 
नाशिक

Nashik Fire Accident: मालेगावात आगीत 22 घरे जळून खाक; लाकडी फळ्यांमुळे आगीचे रौद्ररूप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident: येथील आयशानगर भागातील नुरी हॉल परिसरातील झोपडपट्टीतील फळ्यांच्या घरांना शनिवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत २२ घरे पूर्णपणे जळून खाक झाली.

पत्रे, पटरी, दांडापटाईत व फळ्या यांची १५ घरे दोन मजली तर ७ घरे एक मजली होती. कष्टकऱ्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. सुदैवाने आगीत कोणालाही इजा पोहोचली नाही. (22 houses burnt down in Malegaon Nashik Fire Accident)

महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या आठ बंबांनी २० फेऱ्या करत आग आटोक्यात आणली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा नोंदण्याचे काम सुरु होते. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. आयशानगर भागातील नुरी हॉलजवळ दाट लोकवस्ती आहे. या ठिकाणी पत्रे, बल्ल्या व फळ्यांची घरे मजुरांनी बांधली आहेत. दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नं. १ मधील घराला अचानक आग लागली. फळ्यांची घरे असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले.

गल्लीतील इतर घरे आगीने कवेत घेतली. गल्ली नं. २ व ३ मधील घरेही आगीच्या विळख्यात आली. आगीचे लोळ हवेत पसरताच परिसरातील नागरिक जीव घेत घराबाहेर पडले. दुपारची वेळ असल्याने सामाजिक कायर्कर्ते मोठ्या प्रमाणावर मदतीला धावून आले. अग्निशामक दलाच्या तीनही फायर स्टेशनमधून आठ वाहने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन बंबांनी एकाच वेळी चारही बाजूने आग विझविण्यास सुरवात केली. विभागाचे अग्निशमन अधीक्षक प्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ बंबांनी २० फेऱ्या करत दोन तासात आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

झोपडपट्टीतील मोहम्मद हनिफ मोहम्मद सिद्दीक, जुबैदा बानो जुल्पेकार अहमद, मोहम्मद फरीद मोहम्मद समद, शेख मेहबुब शेख ख्वाजा, शेख अहमद शेख जाफर, शेख जाफर शेख अब्दुल सत्तार, शेख अहमद शेख ख्वाजा, शकील अहमद अब्दुल सत्तार, इस्माईल खान लालखान, युसूफखान अशरफ खान, शाहीद खान युसूफखान, रिजवान अहमद शमसुदोहा, समसुदोहा अब्दुल सत्तार, फईम अहमद नजीर अहमद, वारिस अली बाबू अली, शाहीद अली बाबूअली, हारून शेख याकूब यांची दोन मजली घरे आगीत जळाली.

मोहम्मद तैय्यब अली अन्सारी, जमील अहमद मोहम्मद बशीर, अबरार अहमद मेहबूब अन्सारी, गफूर खान रुस्तुम खान, मोहम्मद इब्राहिम अब्दुल कय्यूम, शोएब अली रियाकत अली, मंजुर अहमद खलील अहमद, कलीमुन निस्सा फैजल बेग यांचे एक मजली घर आगीत भस्मसात झाले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी बाजूला करत अग्निशमन बंबांना वाट मोकळी करून दिली. येथील जमेतुल उलेमाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देत आपदग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जमेतुल उलेमा कमिटी स्थापन करणार असून आपदग्रस्तांचे संसार पुन्हा थाटण्यासाठी

त्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनादेखील आपद्ग्रस्त कष्टकऱ्यांना मदतीचे आश्‍वासन दिले आहे. येथील पूर्व भागातील झोपडपट्टीत यापूर्वी दोन मोठ्या आगी लागल्या होत्या. त्यावेळी देखील कष्टकऱ्यांची घरे आगीत भस्मसात झाली होती.

आगग्रस्तांना मदत करणार ः भुसे

पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. आपद्ग्रस्तांना नियमानुसार शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT