Onion damaged by adding urea water to onion  esakal
नाशिक

Nashik News : चाळीतील 22 टन कांद्यावर युरियाचे पाणी टाकत नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील कुकाणे शिवारात चाळीत साठवलेला २२ टन कांद्यावर (Onion) समाजकंटकांनी युरियाचे पाणी टाकत शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान केले.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (ता.६) रात्री हा प्रकार घडला. (22 tons of onions were damaged by applying urea water chalisgaon nashik news)

तालुक्यासह कसमादेत सध्या उन्हाळी कांदा काढणीचे काम वेगात सुरू आहे. पुरेसा भाव मिळत नसल्याने बहुतेक शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

त्यातच भाजीपाला व इतर मालाला भाव नाही. कुकाणे येथील शेतकरी दीपक जिभाऊ शेवाळे यांनी आठवड्यापूर्वीच कांदा काढला होता. चांगला भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा काढून चाळीत भरला होता. अज्ञात व्यक्तीने चाळीत असलेल्या कांद्यावर युरियाचे पाणी फेकल्याने चाळीतील कांदा सडला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या प्रकारामुळे श्री. शेवाळे यांचा सुमारे अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या २२ टन कांदा खराब झाला. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

"चाळीत भरलेला कांद्याचे अशा स्वरूपात नुकसान केले जाईल याची कल्पना नव्हती. सध्या भाव कमी आहे. चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत भरून ठेवला होता. पोलिसांनी शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी."- दीपक शेवाळे, शेतकरी, कुकाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT