Speaking at a press conference at the rest house, Dr. Nutan Aher and Sunil Aher esakal
नाशिक

Nashik News : देवळा तालुक्यातील 221 पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळण्याची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील तब्बल २२१ पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळण्याची मंजुरी मिळाल्याने भविष्यात या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाले असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन आहेर यांनी दिली.

रविवारी (ता. २६) येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर उपस्थित होते. (221 Panand roads in Deola taluka approved to get rural road status Nashik News nashiknews)

डॉ. आहेर म्हणाल्या, की कोणत्याही गावाच्या शिवार-मळ्यात गेले की रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत असे. या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२० पासून वाखारी गटातील व तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे स्वखर्चातून सर्वेक्षण करत सविस्तर माहिती मिळविली असता, या रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा नसल्याने त्यांना कुठूनही निधी उपलब्ध होत नव्हता.

यावर पर्याय म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील २२१ पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मिळावा, यासाठी दरजोन्नती प्रस्ताव बनवत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळवली आणि यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासह महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्याने या सर्व ग्राममार्गांना व्हीआर नंबर मिळाले आहेत. यामुळे आता रस्ता दुरुस्तीचा निधी मिळविणे सोपे होणार आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना सुनील आहेर यांनी सांगितले, की गटातील व तालुक्यातील काही पाणंद रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली होती, की त्यातून ये-जा करणे अवघड होते. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मर्यादा पडत होत्या.

अशा सोळा पाणंद रस्त्यांचा वाद मिटवून हे रस्ते स्वखर्चाने दुरुस्त केले. मात्र पुढील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याने तसे प्रस्ताव करत मंजुरी मिळवून आणल्याचे समाधान वाटते. यामुळे शेतकऱ्यांची सोयी होणार आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

राज्यासाठी दिशादर्शक पायलट प्रोजेक्ट

देवळा तालुक्यातील तब्बल २२१ पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळण्याची मंजुरी मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत ४२२.३०० किलोमीटरने वाढ होणार आहे.

दर वीस वर्षांनी रस्त्यांची गणना होत असते. त्यातून देवळा तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना २००१-२०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. एकाच वेळी आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मंजूर झाल्याने संपूर्ण राज्यासाठी हा दिशादर्शक पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT