वणी : शहीद यशवंत ढाकणे कुटुंबाला तहसिलदार पंकज पवार यांच्या पुढाकाराने 23 वर्षानंतर जमिनीचा ताबा मिळाला आहे.
तळेगांव दिंडोरी येथील शहीद यशवंत अर्जुन ढाकणे यांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने देण्यात आलेली 2 हेक्टर जमीन 23 वर्षाने आज प्रत्येक्ष ताब्यात मिळाली आहे. (23 years Tehsildars efforts got land for martyr Yashwant Dhokane family at wani Nashik News)
दिंडोरी तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील शहीद यशवंत अर्जुन ढाकणे यांना देशसेवा करत असताना 3 ऑगस्ट 2001 रोजी वीरमरण प्राप्त झाले होते.
महाराष्ट शासनाच्या वतीने ढाकणे कुटुंबाला गावातीलच पश्चिमेकडील पाझर तलावाशेजारी असलेली शासनाची जमीन गट नंबर 307 क्षेत्र तळेगांव दिंडोरी ग्रामपंचायतच्या नावावर असलेली एकूण क्षेत्रापैकी 2 हेक्टर क्षेत्र हे जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशाने दि.19/1/2002 अन्वये वीरमाता सौ बबूताई अर्जुन ढाकणे यांना वितरित करणेकामी शासनाचे आदेश पारित केलेले होते.
परंतु या क्षेत्रावर गावातील मयत रामनाथ विठ्ठल जाधव व त्यांचे वारसदार श्रीमती मथुराबाई रामनाथ जाधव यांनी अतिक्रमण केलेले होते. जाधव यांची जमीन 1990 साली पाझर तलाव साठी आदिग्रहित केलेली होती.
व त्याचा मोबदला म्हणून त्याना गेलेल्या क्षेत्राइतकी जमीन व रोख स्वरूपात मोबदला मिळाला होता. त्याना ग्रामपंचायत च्या नावावर असलेल्या क्षेत्रापैकी क्षेत्र दिले होते. परंतु त्यानी शेजारील सर्वच उर्वरित क्षेत्रावर अतिक्रमण करून उत्पन्न घेत होते.
या उर्वरित क्षेत्रापैकी शासनाच्या वतीने शहीद ढाकणे यांच्या कुटूंबाला 2 हेक्टर क्षेत्र देण्यात आलेले होते. याबाबत ढाकणे कुटुंब यांनी वेळोवेळी मिळालेली जमीन ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु याबाबत त्याना अर्ज फाटे करावे लागत होते.
यासाठी 23 वर्षाचा कालावधी गेला. यात दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी शासकीय आदेशाला प्राधान्य देत वीरमाता पिता यांना न्याय मिळवून देण्यासाठी गावांतील सर्व जेष्ठ ग्रामस्थ यांची एकत्रित मीटिंग घेतली व संबंधित अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
अखेर 26 जानेवारी पूर्वी 25 जानेवारीला स्वता तहसिलदार पंकज पवार यांनी उपस्थित राहून वीरमाता पिता यांना जमिनीचा ताबा दिला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोहिमेत तहसीलदार पंकज पवार, मंडळ अधिकारी भारती रकीबे, तलाठी शरद गोसावी, भूकरमापक मानकर, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"पुत्र शहीद यशवंत ढाकणे यास देशसेवा करतांना वीरमरण प्राप्त झाले. शासनाने आम्हाला 23 वर्षांपूर्वी 2 हेक्टर जमीन दिली पण ती प्रत्येक्षात ताब्यात मिळाली नव्हती. त्यावर अतिक्रमण होते. याबाबत आज तहसीलदार पवार यांनी आम्हाला न्याय मिळवून देत जमिनीचा ताबा मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचे व सर्व अधिकारी व ग्रामस्थ यांचे आभार."
- सौ. बबुताई अर्जुन ढाकणे, वीरमाता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.