नांदगाव : नियोजित बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी पुन्हा एकदा मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. गुरुकुल तंत्रनिकेतनपासून रेल्वेच्या उड्डाणपुलापर्यंत एकूण ४ किलोमीटर बाह्यवळण रस्त्यासाठी एकूण २४ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे.
किलोमीटरला ५ लाख १२ हजार रुपये असा सर्वेक्षणासाठी खर्च होणार आहे. (24 Lakh Proposal for New Survey for Nandgaon Bypass National highway becoming headache SAKAL Exclusive)
बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेल्यावर्षी निधी मिळाला होता. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन बाह्यवळण रस्त्याच्या प्रकल्पीय आराखड्याचे काम पुढे सरकले असते. आता मात्र, त्याच कामासाठी परत प्रस्ताव पाठविण्याची वेळ महामार्ग प्राधिकरणावर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यमार्ग २०१७ मध्ये महामार्गात रूपांतरित झाला. तेव्हा महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पीय आराखड्यात बाह्यवळणाचा समावेश होणे गरजेचे होते.
मात्र, प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किमतीत वाढ होईल म्हणून प्राधिकरणाने प्रकल्पीय आराखड्यात समावेश केला नव्हता.
वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीवर पर्याय म्हणून बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सरकारच्या पायाभूत समितीने दहा वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. तेव्हापासून बाह्यवळणाचा मुद्दा कागदावर अडकून पडला आहे.
जूनमध्ये केंद्राला प्रस्ताव
नाशिक विभागाने गेल्यावर्षी बाह्यवळण रस्त्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी तयार केलेला प्रकल्पीय आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता.
त्यासाठी मनमाड बाह्यवळण रस्त्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी ४० लाख रुपये व नांदगावसाठी १९ लाख रुपये अशी तरतूद मंजूर झाली होती.
मात्र गेल्या वर्षभरात सर्वेक्षणासाठी मिळालेला निधी खर्च झाला नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणावर नव्याने प्रस्ताव पाठवावा लागला. जूनमध्ये बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.
अतिरिक्त वाहतुकीचा ताण
मालेगाव-बेंगळुरु महामार्गाच्या लिंक रोडवरील मनमाड नजीकच्या उड्डाणपुलाचा भरावाचा काही कोसळल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. वळवलेल्या वाहतुकीचा अतिरिक्त ताण नांदगाव शहरातील वाहतुकीवर पडला आहे.
अगोदरच नवीन महामार्ग तयार झाला असल्याने चांदवड, जळगावकडील वाहतूक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात अतिरिक्त ताण वाढल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.
दररोज १० हजारांहून अधिक वाहनांच्या रहदारीचा रेटा वाढत असून वाहनांच्या गर्दीतून वाट काढत महामार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.