Narendra Darade, Kishore Darade esakal
नाशिक

Nashik News : येवला शहरात 25 कोटींची कामे मंजूर; आमदार दराडे बंधूंचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : येथील विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात २५ कोटीची कामे मंजूर झाली असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (ता. १७) पासून २३ तारखेपर्यंत होणार आहे.

रस्ते काँक्रिटीकरण, गटारी तसेच सुशोभीकरणाची विविध कामे होऊन शहरातील दुर्लक्षित वंचित भागाला यामुळे विकासाचा लाभ होणार आहे.

आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे होत असून शहरासाठी विशेष पाठपुराव्याने निधी मंजूर झाला असल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली. (25 crore works approved in Yeola city Follow up of MLA Darade brothers Nashik News)

शहराच्या विविध भागात अनेक छोटी-मोठी कामे रखडलेली असून नागरिकांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून शासनाकडे सतत पाठपुरावा करून आमदार दराडे बंधूंनी ही कामे मंजूर करून आणली आहे.

विविध प्रभागात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजपासून भूमिपूजन केले जाणार आहे. यापुढेही मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे आमदार दराडे बंधू यांनी सांगितले आहे.

शहरातील हुडको कॉलनी परिसरातील भूमिगत गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरणकरण्यासाठी दीड कोटी तर हुडको भागातील नवीन गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरण करण्यासाठी ७८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

हुडको वसा‍हतीत नाल्‍याशेजारी रस्‍ता गटारीसह काँक्रिटीकरण, रोकडे हनुमान जवळील पुंडलिक पवार ते नागरे सर भुयारी गटारीसह रस्‍ता काँक्रिटीकरण, स. नं. ६४ अभिन्‍यासातील भूमिगत गटारीसह रस्‍ते खडीकरणासह डांबरीकरण, स. नं. ६५ मधील अभिन्‍यासातील रस्‍ते काँक्रिटीकरण,

गणी एजंट ते एसाक ड्रायव्‍हर पर्यंत भूमिगत गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरण, यासीन कोबंडीवाले ते इसन केळेवाले पर्यंत भूमिगत गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरण, अजीजभाई यांच्या घरापासून ते अन्‍सार फ्रूटवाले पर्यंत भूमिगत गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरण, हमीद लिंबूवाले यांच्या घरापासून ते अकबरभाई पर्यंत भूमिगत गटारीसह रस्‍ते काँक्रिटीकरण,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नाला ते चोपदार मळा पर्यंत भूमिगत गटारीसह रस्‍ता काँक्रिटीकरण, जावेद चायवाल ते असलम मेंबर पर्यंत भूमिगत गटारीसह रस्ता काँक्रिटीकरण, मुकेश चवळे ते भंडारी प्रिंटर्स भूमिगत गटार खडीकरणासह डांबरीकरण, ६० फुटी रोड सोनवणे वस्‍ती ते पारेगाव रोड,

जॉंगिग ट्रॅकसह रस्‍ता खडीकरणासह डांबरीकरण, कासलीवाल ते मिटके सरघरापर्यत, पद्मावती कॉलनी भागात काँक्रिटीकरण, म्‍हसोबा नगर तसेच नित्‍यानंद नगर येथे भूमिगत गटार खडीकरणासह काँक्रिटीकरण करणे, यमा बापू यांच्‍या घरासमोरील रस्‍ता भुयारी गटारीसह काँक्रिटीकरण,

आर. आर. पाटील ते अनिरुद्ध मल्‍टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत भूमिगत गटार खडीकरणासह काँक्रिटीकरण, वरोडे यांचे मागील भूमिगत गटारीसह रस्‍ता काँक्रिटीकरण, प्रशांत शिंदे कॉम्‍पलेक्‍स ते चारीपर्यंत रस्‍ता खडीकरणासह डांबरीकरण, साई बिल्डर येथील भूमिगत गटार खडीकरणासह डांबरीकरण,

बाजीराव नगरमध्ये डॉ. विंचू ते घुगे-कोल्हे घर, साई बिल्‍डर येथील डोंगरे, डमरे यांच्‍या घराशेजारी, गोविंद नगर दिलीप जगताप, कदम यांच्या घराजवळील, डीपी चारी ते पारेगांव रोड, देवरे यांच्‍या घराजवळील, अयोध्या नगरी,

मोरे वस्‍ती वरील रस्ते भूमिगत गटार खडीकरणासह डांबरीकरण केले जाणार आहेत. याशिवाय शहर चौक सुशोभीकरणासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एकूण ४२ कामांचा समावेश असून २५ कोटी मंजूर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT